- ऋजुता लुकतुके
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये विराट, हार्दिक, रोहित आणि रविंद्र जाडेजा हे क्रिकेटर चक्क जीटी ६ व्हिडिओ गेममधील पात्रांसारखे दिसत आहेत. (Cricket Stars in GTA 6 Roles)
‘ग्रँड थेफ्ट ऑटो ६’ या व्हीडिओ गेमचा ट्रेलर सोमवारी अचानकपणे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. गंमत म्हणजे यात विराट कोहली, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा हे आघाडीचे भारतीय क्रिकेटपटू व्हिडिओ गेममधील पात्रांच्या वेशात झळकले आहेत. खेळाडूंच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपने तयार केलेल्या प्रतिमा या ट्रेलरमध्ये वापरण्यात आल्या आहेत. (Cricket Stars in GTA 6 Roles)
जिओ सिनेमावर हा ट्रेलर सोमवारी प्रसिद्ध झाला. या चार क्रिकेटपटूंबरोबरच के एल राहुलही यात आहे. (Cricket Stars in GTA 6 Roles)
हा ट्रेलर लोकांच्या पसंतीस उतरला असून तशा प्रतिक्रियाही लोकांनी दिल्या आहेत. (Cricket Stars in GTA 6 Roles)
Dropping it 🔥 like a #GTA6 🎮
Which of these #TeamIndia ⭐️⭐️⭐️⭐️⭐️can you identify from the #GTA universe? 😍#JioCinemaSports pic.twitter.com/ZZQkJblBWn
— JioCinema (@JioCinema) December 5, 2023
ग्रँड थेफ्ट ऑटो ६ हा खेळ व्हाईस सिटी या काल्पनिक शहरात घडतो आणि यावेळी खेळात एक महिला पात्रही आहे. (Cricket Stars in GTA 6 Roles)
— JioCinema (@JioCinema) December 5, 2023
खरंतर या व्हीडिओ गेमचा अधिकृत ट्रेलर लाँच अपेक्षित होता. पण, गेम वेळेआधीच फुटल्यामुळे सोशल मीडियावर गेमच्या निर्मात्यांना असा ट्रेलर लाँच करावा लागला. (Cricket Stars in GTA 6 Roles)
— JioCinema (@JioCinema) December 5, 2023
(हेही वाचा – Mahaparinirvan Din 2023 : पुढच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंदु मिल स्मारकावर अभिवादन, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन)
‘आमचा गेम आधीच लीक झाला आहे. त्यामुळे खरा ट्रेलर इथं पाहा,’ असं गेमची निर्माती कंपनी रॉकस्टार गेम्सने ट्विटरवरून जाहीर केलं आहे. हा ट्रेलर प्रसिद्ध झाल्यापासून अर्ध्या तासाच्या आत यूट्यूबवर २२ लाख लोकांनी तो पाहिला आहे. ट्रेलरला तशीच पसंती ट्विटरवरही मिळत आहे. (Cricket Stars in GTA 6 Roles)
दहा वर्षांपूर्वी ग्रँड थेफ्ट ऑटो हा व्हिडिओ गेम पहिल्यांदा बाजारात आला तेव्हापासून या खेळातून कंपनीने १० अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळवला आहे. (Cricket Stars in GTA 6 Roles)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community