Bond between Virat And Mahi: विराट कोहलीने स्टोरीला शेअर केलेला धोनीचा ‘हा’ फोटो पाहिलात का?

भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडूंमधील सर्वात मोठ्या नावांपैकी दोन नावे म्हणजे एमएस धोनी आणि विराट कोहली. दोघेही अव्वल दर्जाचे क्रिकेटर असून धोनी निवृत्त झाला असला तरी आजही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे्. तर विराट फॅन्सची संख्याही कोट्यवधी आहे. अशामध्ये स्वत: कोहलीही एमएस धोनीचा फॅन आहे.

विराटने शेअर केलेला इन्स्टाग्राम स्टोरीमधील धोनीचा फोटो 

हे विराटने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून दिसत आहे. या स्टोरीमध्ये विराटने एका पाण्याच्या बाॅटलचा फोटो पोस्ट केला असून, त्या पाण्याची जाहिरात धोनी करत असल्याने धोनीचा फोटो त्या बाॅटलवर आहे आणि कोहलीने धोनी सर्वत्र आहे, असे म्हणतच ही स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवर धोनी आणि विराट चाहत्यांसह क्रिकेट प्रेमी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

( हेही वाचा: FIFA वर्ल्डकप २०२२ : जगभरात फुटबॉल फिव्हर; विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर! )

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here