क्रिकेट… संपूर्ण जगात हा एक प्रतिष्ठेचा खेळ मानला जातो. भारतात सुद्धा या खेळाची किती क्रेझ आहे, हे काही नव्याने सांगायची गरज नाही. त्यामुळे या खेळाचे वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी)ने क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
२०२८ला लॉस अँजिलीस येथे होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आयसीसी बोली लावणार आहे. यासाठी आयसीसीने एक समिती स्ठापन केली आहे. अमेरिकेत क्रिकेटचे ३० मिलियन चाहते आहेत. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनासाठी लॉस अँजिलीस सारखी दूसरी जागा असूच शकत नाही.
(हेही वाचाः पानिपतचा आहे तो ‘मराठा’! ज्याने फेकला आरपार भाला! )
याआधीही ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश
१९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यात फक्त ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांनीच सहभाग घेतला होता. आता १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट स्पर्धा होणार आहे.
२०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झालेच आहे आणि आता ऑलिम्पिक स्पर्धेतही क्रिकेट आगमनासाठी सज्ज आहे.
चाहत्यांना प्रतीक्षा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रमुख ग्रेग बार्क्ले म्हणाले की, सर्वप्रथम आयसीसीच्या प्रत्येक सदस्याच्या वतीने मी ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजक समितीचे, तसेच जपानच्या प्रत्येक नागरिकाचे अभिनंदन करतो. त्यांनी टोकियोत ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करुन दाखवले. स्पर्धा पाहताना अत्यानंद झाला. भविष्यात क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तर ते आम्हाला नक्कीच आवडेल. जगभरात क्रिकेटचे करोडो चाहते आहेत. त्यापैकी ९० टक्के चाहत्यांनाही क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा असे वाटत आहे.
(हेही वाचाः 15 ऑगस्टपासून कसा मिळणार लोकल ट्रेनचा पास? जाणून घ्या संपूर्ण माहिती)
Join Our WhatsApp Community