पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ! ‘त्या’ महिलेने केली विनयभंगाची तक्रार, गुन्हा दाखल

128

दोन महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल यांच्यात सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादाचा व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाला होता. त्यावेळी पृथ्वी शॉ याने सपना गिलविरोधात गैरव्यवहाराची तक्रार केली होती आणि तिला अटक करण्यात आली होती. मात्र आता सपना गिलने पृथ्वी शॉ याच्याविरोधात विनयभंगचा आरोप करत या तक्रारीवर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

( हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; नावे बदलण्याचा अधिकार सरकारचा )

सपनाने तक्रारीत काय म्हटले आहे? 

पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष सुरेंद्र यादव यांच्याविरोधात सपना गिलने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सपना गिलने आपल्या तक्रारीत पृथ्वी शॉने विनयभंग केल्याचे नमूद केले आहे. जीवघेण्या हत्याराने आपल्यावर हल्ला केल्याचा दावाही सपनाने केला आहे. दरम्यान, पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रारीनंतरही गुन्हा दाखल न केल्यामुळे विमानतळ पोलिस स्टेशनचे अधिकारी सतीश कवनकर आणि भागवत गरंडे यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 166A अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.