- ऋजुता लुकतुके
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं आपल्या कारकीर्दीतील ९०० वा गोल अखेर गुरुवारी साजरा केला. नॅशनल लीगमध्ये पोर्तुगाल विरुद्ध क्रोएशिया सामन्यातील पहिला गोल रोनाल्डोचाच होता. तोच त्याचा विक्रमी गोल ठरला. सामन्याच्या ३४ व्या मिनिटालाच नुनो मेंडिसने दिलेल्या एका तिरक्या पासवर हा सोपा गोल केला. रोनाल्डोला चेंडू फक्त गोलजाळ्याची दिशा द्यायची होती. ते काम त्याने अचूक केलं. अखेर पोर्तुगालने २-१ असा विजयही मिळवला.
CRISTIANO RONALDO REACHES 900 CAREER GOALS FOR CLUB AND COUNTRY 🤯🔥
JUST LOOK AT WHAT IT MEANS TO HIM ♥️
— CentreGoals. (@centregoals) September 5, 2024
(हेही वाचा – Vinod Kambli : विनोद कांबळीने स्वत: दिला आपल्या तब्येतीचा महत्त्वाचा अपडेट)
हा गोल झाल्यानंतर रोनाल्डो काही क्षण भावूक झाला होता. तो जमिनीवर बसला आणि त्याचे डोळेही पाणावले होते. ९ वर्षीय रोनाल्डोचा हा १३१ वा आंतरराष्ट्रीय गोल होता. तर क्लब स्तरावर त्याची कारकीर्द अतुलनीय आहे. रियाल माद्रिदसाठी त्याने ४५० गोल केले आहेत. तर मँचेस्टर युनायटेडसाठी १४५, युवेंटससाठी १०१ आणि सध्याच्या अल नासर क्लबसाठी त्याने आतापर्यंत ६८ गोल केले आहेत. रोनाल्डोने आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात पोर्तुगालमधील स्पोर्टिंग लिस्बन क्लबकडून केली होती. तिथेही त्याने ५ गोल केले आहेत.
I dreamed of this, and I have more dreams. Thank you all! pic.twitter.com/2SS3ZoG2Gl
— Cristiano Ronaldo (@Cristiano) September 5, 2024
(हेही वाचा – Paris Paralympic Games 2024 : पॅरालिम्पिक खेळांत कपिल परमारला ज्युदोमध्ये कांस्य)
व्यावसायिक फुटबॉलच्या जगात ९०० गोलचा टप्पा पार करणारा रोनाल्डो पहिला पुरुष खेळाडू आहे. क्लब आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळून रोनाल्डोने ही मजल मारली आहे. त्याचा निकटचा प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाचा लायनेल मेस्सी ८५९ गोलसह दुसऱ्या स्थानावर आहे. ‘या गोलचं मूल्य खूप मोठं आहे. मला हा पल्ला गाठण्याची आस लागून राहिली होती. कारकीर्द चांगली सुरू राहिली तर हा टप्पा कधी ना कधी येईल, हे माहीत होतं. पण, ती वेळ महत्त्वाची असते,’ असं ख्रिस्तियानो रोनाल्डोनं एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
सर्वाधिक गोलच्या यादीत रोनाल्डो आणि मेस्सीनंतर पुढील दोन खेळाडू जोसेफ बायकन आणि पेले हे आहेत. थोडक्यात, पहिल्या दहांत असलेले दोनच खेळाडू सध्या खेळतायत. बाकी सगळे निवृत्त झाले आहेत. त्यातून रोनाल्डो आणि मेस्सीची महती कळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community