Dhoni-Jadeja Viral Pic : धोनी आणि जाडेजाची जोडी शेतात नेमकं काय करत होती?

Dhoni-Jadeja Viral Pic : चेन्नई सुपरकिंग्ज संघाने शेअर केलेला एक फोटो सध्या कमालीचा व्हायरल झाला आहे.

94
Dhoni-Jadeja Viral Pic : धोनी आणि जाडेजाची जोडी शेतात नेमकं काय करत होती?
  • ऋजुता लुकतुके

चेन्नई सुपरकिंग्ज या आयपीएल फ्रँचाईजीने ट्विटर या समाज माध्यमावर शेअर केलेला फोटो खूपच व्हायरल झाला आहे. या फोटोत महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा चेन्नई संघ सहकारी रवींद्र जाडेजा एका शेतात एकत्र दिसत आहेत. या संदेशाचा मथळाही अगदी आकर्षक देण्यात आला आहे. ‘थाला आणि थलपती जेव्हा एका मैदानात एकत्र येतात,’ असं चेन्नई फ्रँचाईजीने संदेशात म्हटलं आहे. सगळ्या अधिकृत समाज माध्यमांवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. रवींद्र जाडेजाने हा सेल्फी घेतला आहे आणि पाठीमागे धोणीही दिसत आहे. (Dhoni-Jadeja Viral Pic)

(हेही वाचा – Duleep Trophy : दुलिप करंडकाच्या पहिल्या फेरीतून मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांना विश्रांती)

यात गंमत अशी आहे की, रवींद्र जाडेजाने मूळ फोटो २५ ऑगस्टला आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केला आहे. यात शेतात तो एकटाच दिसत आहे. पण, चेन्नई फ्रँचाईजीच्या समाज माध्यमांच्या चमूने थोडीशी चालाखी करून हा फोटो एडिट केला आहे आणि यात जाडेजाच्या मागे धोनी दाखवला आहे. (Dhoni-Jadeja Viral Pic)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravindrasinh jadeja (@royalnavghan)

(हेही वाचा – US Open Longest Game : जेव्हा ५ तास आणि ३५ मिनिटांनंतर डॅनिएल इव्हान्सने कॅचनोव्हला हरवलं….)

पण, चेन्नई सुपरकिंग्जने एडिट करून नवीन पोस्ट केल्यावर चाहत्यांनी लगेच ती व्हायरल केली. त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडू लागला आहे. दोन दिग्गज एका फोटोत, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. पण, काही चाणाक्ष चाहत्यांनी फोटो एडिटेड असल्याचं लगेच ओळखलंही.

रवींद्र जाडेजा सध्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या बाहेर आहे. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर त्याने टी-२० मधून आंतरराष्ट्रीय निवृत्ती पत्करली आहे. पण, तेव्हापासून तो एकदिवसीय मालिकाही दुखापतीमुळे खेळलेला नाही. मध्यंतरी घरातील समस्येमुळेही तो ग्रासला होता. त्याच्या वडिलांनी त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जाडेजाच्या गैरहजेरीवरही अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तूर्तास, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट तो खेळणार आहे. (Dhoni-Jadeja Viral Pic)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.