Commonwealth Games 2022 : भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानचा केला पराभव

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंना मात ५-० च्या फरकाने एक दमदार असा विजय मिळवला आहे. यावेळी पीव्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत अशा दिग्गज बॅडमिंटनपटूंच्या दमदार खेळाच्या भारताने ही कामगिरी केली आहे. भारताच्या सर्वच बॅडमिंटनपटूंनी पाचही सामन्यात सरळ सेट्समध्ये विजय मिळवत पाकिस्तानला मात दिली.

(हेही वाचा मराठा समाजासाठीच्या ईडब्लूएस आरक्षणासाठीचा अध्यादेश उच्च न्यायालयाकडून रद्द )

सर्वात आधी भारताच्या सुमीत रेड्डी आणि आश्विनी पोनप्पा या जोडीने मिश्र सामन्यात पाकिस्तानच्या महंमद इरफान आणि गझला सिद्दीकी यांना २१-९ आणि २१-१२ च्या फरकाने मात देत १-० ची आघाडी घेतली. त्यानंतर पुरुष एकेरीचा सामना पार पडला. यामध्ये भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने पाकिस्तानच्या मुराद अलीला २१-७ आणि २१-१२ अशा सरळ सेट्समध्ये ममात देत भारताला २-० ची आघाडी मिळवून दिली. ग्रुप ए मधील तिसरा सामना महिला एकेरीचा होता. ज्यात भारताची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मैदानात उतरली. तिने पाकिस्तानच्या महूर शेहजाद हीला २१-७ आणि २१-६ अशा सरळ सेट्समध्ये सहज मात देत सामना जिंकला आणि भारताला ३-० ची विजयी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरच्या दोन सामन्यात पुरुष दुहेरीत सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या प्रसिद्ध जोडीने पाकिस्तानच्या मुराद अली आणि मुहम्मद इरफान यांना २१-१२ आणि २१-९ च्या फरकाने मात देत भारताला४-० ची आघाडी मिळवून दिली. अखेरच्या सामन्यात महिला दुहेरीत भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी पाकिस्तानच्या महूर शेहजाद आणि गझला सिद्दकी यांना २१-४ आणि २१-५ अशा मोठ्या फरकाने मात देत सामना जिंकला आणि भारताला पहिल्या दिवशी पाकिस्तानवर ५-० ने विजय मिळवून दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here