CWG 2022 : बीडच्या अविनाश साबळेला स्टीपलचेस प्रकारात रौप्य पदक

172

महाराष्ट्रातील बीडच्या एका छोट्याशा गावचा रहिवासी असलेल्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात रौप्य पदक मिळवले आहे. त्याने ८.११.२० मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला. त्याची ही धाव पाहून स्टेडियमवर भारताचा जयघोष होऊ लागला.

( हेही वाचा : CWG 2022: भारताला कुस्तीत तिसरे सुवर्ण; बजरंग आणि साक्षीनंतर आता दीपक पुनियाने केली कमाल)

केनियाचे तीन खेळाडूवर आघाडीवर होते. मात्र चौथ्या क्रमांकावर असलेल्या अविनाशने अखेरच्या राऊंडपर्यंत हे स्थान कायम राखले आणि अखेरच्या लॅपमध्ये अविनाशने मुसंडी मारली आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता अब्राहम किबिव्होटपेक्षा अविनाश फक्त ५ सेकंद मागे होता. अब्राहमने ८.११.१५ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली.

कोण आहे अविनाश कांबळे

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा अविनाश रहिवासी आहे. १३ सप्टेंबर १९९४ रोजी त्याचा जन्म झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून घर ते शाळा असा त्याचा रोजचा ६ किलोमीटरचा पायी प्रवास सुरू झाला. मग तो कधीकधी धावत हे अंतर पार करायचा तर कधी चालत. बारावीनंतर तो भारतीय सैन्यात ५ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला. २०१३-१४ मध्ये सियाचिन, तर २०१५ मध्ये राजस्थान व सिक्कीम येथे त्याची पोस्टींग झाली होती. २०१५ मध्ये त्याने आंतर-सैन्य क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग घेतला. पण, ट्रेनर अमरिष कुमार यांनी त्याला स्टीपलचेल (अडथळ्यांच्या शर्यतीत) सहभाग घेण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तीन महिन्यांत २० किलो वजन घटवले होते. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर अविनाश घरी परतला असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. पण, त्यातून सावरत त्याने मेहनत घेत मैदानावर पुनरागमन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.