CWG 2022: भारताला कुस्तीत तिसरे सुवर्ण; बजरंग आणि साक्षीनंतर आता दीपक पुनियाने केली कमाल

118

भारताच्या दीपक पुनियाने बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने पुरुषांच्या 86 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मुहम्मद इनामचा पराभव करुन सुवर्णपदक जिंकले. कुस्तीतील भारताचे हे तिसरे सुवर्ण पदक आहे. दीपक पुनियापूर्वी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सुवर्णपदक जिंकले आहे.

( हेही वाचा: ‘अशा’ चलनात आल्या ‘कागदी नोटा’ )

पाकिस्तानच्या कुस्तीपटूला हरवले

दीपक पुनियाने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंतचे सर्वात संस्मरणीय सुवर्णपदक मिळवून दिले. फ्रीस्टाइल 86 किलो गटात पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा पराभव करुन त्याने ही कामगिरी केली. इनामविरुद्ध पुनियाने जबरदस्त कामगिरी केली. त्याने पाकिस्तानी कुस्तीपटूला एकही संधी दिली नाही. दीपकने हा सामना 3-0 ने जिंकला. भारताचे हे तिसरे सुवर्ण आणि कुस्तीतील एकूण चौथे पदक आहे. यापूर्वी अंशू मलिकने रौप्य, बजरंग पुनियाने सुवर्ण आणि साक्षी मलिकनेही सुवर्णपदक पटकावले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.