आयुष्यात निरोगी राहायचे असेल व्यायाम आवश्यक असतो, त्यासाठी सायकल (Cycle) चालवणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ ऑगस्ट २०२० ला फिट इंडियाची संकल्पना मांडली होती, त्यानुसार ठाणे – डोंबिवलीत राहणारे तीन अवलिया कोलकता ते चेन्नई सायकलने प्रवासाला लागले आहेत. त्यांचा प्रवास रविवार, २२ डिसेंबर ला रामकृष्ण मठात संपला.
ठाणे जनता सहकारी बँकेतील अधिकारी शशांक वैद्य (54 वर्ष), खासगी कंपनीतील निवृत्त अधिकारी संजय दाते (58 वर्ष) आणि निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजू (आनंद) पाटील या तिघांनी ही मोहीम ९ डिसेंबर २०२४ ला कोलकता येथून सुरु केली आणि २२ डिसेंबरला ते चेन्नई येथे रामकृष्ण मठात पोहचले. मागील 14 दिवसांचा त्यांचा हा सायकलने (Cycle) सुरु असलेला प्रवास 1700 किमीहुन अधिक अंतराचा होता. शशांक वैद्य यांनी २०१९ ला पुणे ते जम्मू अशी मोहीम घेतली, तेव्हा त्यांच्यासोबत ११ जण होते. तर २०२२मध्ये त्यांनी कन्याकुमारी ते चेन्नई असा सायकलने (Cycle) प्रवास केला होता.