D Gukesh, Erigaisi : बुद्धिबळ क्रमवारीत अर्जुन एरिगसी आणि डी गुकेश पहिल्या पाचांत

D Gukesh, Erigaisi : गुकेश आणि एरिगसी यांच्या एलो गुणांमध्ये ५ गुणांचं अंतर आहे.

46
D Gukesh, Erigaisi : बुद्धिबळ क्रमवारीत अर्जुन एरिगसी आणि डी गुकेश पहिल्या पाचांत
  • ऋजुता लुकतुके

डी गुकेशने ताज्या फिडे क्रमवारीत आपलं स्थान कायम राखलं आहे. तो सध्याचा भारताचा अव्वल बुद्धिबळपटू ठरला आहे. अर्जुन एरिगसीही त्याच्या पाठोपाठ असून दोघांच्या एलो रेटिंग गुणांमध्ये आता फक्त ५ गुणांचा फरक आहे. गुकेशचे २,७८७ एलो गुण आहेत. तर अर्जुन एरिगसीने आंतरराष्ट्रीय क्रमवारीत फाबियाने कारुआनाला मागे टाकत चौथं स्थान पटकावलं आहे. गुकेश तिसऱ्या स्थानावर आहे. खरंतर जानेवारी २०२५ पर्यंत अर्जुन एरिगसी भारताचा अव्वल बुद्धिबळपटू होता. पण, त्यानंतर त्याच्या खालावलेल्या कामगिरीमुळे त्याची क्रमवारीतही घसरण झाली होती. (D Gukesh, Erigaisi)

दुसरीकडे, टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत चांगली कामगिरी करत गुकेश अव्वल भारतीय बुद्धिबळपटू ठरला होता. यापूर्वी अर्जुन एरिगसीने २,८०० एलो रेटिंग गुण पार केले होते. अशी कामगिरी करणारा तो विश्वनाथन आनंद नंतरचा दुसरा भारतीय ठरला होता. पण, तिथून त्याची घसरण झाली. अलीकडेच बुंडेसलीगामध्ये सलग ४ विजय मिळवत त्याने आपला फॉर्म पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. (D Gukesh, Erigaisi)

(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह, आकाशदीप यांचं पुनरागमन लांबलं)

ताज्या फिडे क्रमवारीवर अजूनही स्वीडनच्या मॅग्नस कार्लसनचं वर्चस्व आहे आणि २,८३७ एलो रेटिंग गुणांसह तो अव्वल आहे. तर जपानच्या हिकारू नाकामुरानेही आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे. त्याचे २,८०४ एलो रेटिंग गुण आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर डी गुकेश आणि चौथ्या क्रमांकावर अर्जुन एरीगसी आहेत. २०११ पासून फिडे क्रमवारीवर मॅग्नस कार्लसनचं राज्य आहे. गुकेश आणि एरिगसीबरोबरच आणखी एक भारतीय बुद्धिबळपटू आर प्रग्यानंद पहिल्या दहांत आहे. त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान पटकावलं असून तो सातव्या क्रमांकावर आहे. (D Gukesh, Erigaisi)

प्रग्यानंदाने चीनच्या वाय यीला मागे टाकलं आहे. तर भारताचा आणखी एक खेळाडू अरविंद चिदंबरम हा अकराव्या क्रमांकावर आहे. (D Gukesh, Erigaisi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.