- ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशन अर्थात फिडेनं आयोजित केलेल्या कँडिडेट्स चषक (Candidates Cup) स्पर्धेत भारताच्या डी गुकेशने (D. Gukesh) इतिहास रचला. सतराव्या वर्षी त्याने ही स्पर्धा जिंकलीच. जगज्जेत्या डिंग लिरेनला आव्हान देणारा तो वयाने सगळ्यात लहान बुद्धिबळपटू ठरला आहे. शिवाय विश्वनाथन आनंद नंतर ही मानाची स्पर्धा जिंकणारा तो फक्त दुसरा भारतीय आहे. सोमवारी कँडिडेट्स चषकाच्या अंतिम फेरीत त्याने जपानचा ग्रँडमास्टर नाकामुरा (Grandmaster Nakamura) बरोबरचा सामना बरोबरीत सोडवला. काळ्या मोहऱ्यांनी खेळताना गुकेशने सावध खेळ करत बरोबरी साधली. त्यासह कँडिडेट्स चषक आपल्या नावावर केला. निकटच्या तीन प्रतिस्पर्ध्यांपेक्षा गुकेशकडे अर्धा गुण जास्त होता. (D. Gukesh)
(हेही वाचा- Mark Zuckerberg: AIवर कोट्यवधी रुपये मेटा खर्च करणार; मार्क झुकेरबर्ग यांची घोषणा)
यापूर्वी २०१४ मध्ये विश्वनाथन आनंदने कँडिडेट्स चषक (Candidates Cup) स्पर्धा जिंकली होती. तेव्हा आनंदच्या गावात चेन्नईत गुकेश लहानाचा मोठा होत होता. आनंदच्या विजयातूनच त्याने बुद्धिबळाकडे वळण्याची प्रेरणा घेतली होती. आता त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एक मापदंड ओलांडला आहे. टोरंटोमध्ये कँडिडेट्स चषकानंतर गुकेशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिथल्या भारतीय वंशाच्या लोकांनी त्याच्या अभिनंदनासाठी एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. (D. Gukesh)
🇮🇳 Gukesh D, winner of the 2024 #FIDECandidates, at a fan meetup in Trinity Bellwoods Park, 🇨🇦 Toronto, organised by @ChessbaseIndia!@DGukesh chatted with small kids and answered their questions, signed autographs and happily smiled for selfies! 🤩 pic.twitter.com/XzU7CnPF2A
— International Chess Federation (@FIDE_chess) April 24, 2024
टोरंटोच्या बेलवूड्स पार्कमध्ये एका कार्यक्रमात गुकेश (D. Gukesh) सहभागी झाला होता. तिथे लहान मुलांशी बुद्धिबळावर गप्पाही मारल्या. फिडेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हीडिओ शेअर केला आहे. गुकेशने इथं जमलेल्या लोकांबरोबर फोटो काढले, त्यांना सह्या दिल्या आणि गप्पाही मारल्या. गुकेशचे कुटुंबीय सध्या भारतातच आहेत. त्याचे वडील पेशाने डॉक्टर आहेत. तर आई मायक्रोबायोलॉजिस्ट. (D. Gukesh)
(हेही वाचा- Weather Department: मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुण्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस; हवामान खात्याचा इशारा)
कँडिडेट्स चषकातील विजयानंतर आता गुकेशची (D. Gukesh) जगज्जेतेपदासाठीची लढत या वर्षाच्या अखेरीस चीनचा अव्वल खेळाडू डिंग लिरेनशी होईल. लिरेन सध्या बुद्धिबळापासून काहीसा दूर आहे. आणि त्याला खेळाचा फारसा सराव नसल्याचंही बोललं जातंय. (D. Gukesh)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community