D Gukesh : जगज्जेत्या गुकेशने स्पर्धेची मानसिक तयारी कशी केली?

D Gukesh : युवा जगज्जेता गुकेशची डिंग लिरेनसमोर मानसिक कसोटीही लागली.

28
D Gukesh : जगज्जेत्या गुकेशने स्पर्धेची मानसिक तयारी कशी केली?
  • ऋजुता लुकतुके

अलीकडेच भारताच्या डी गुकेशने (D Gukesh) १८ वर्ष १६५ दिवसाचा असताना जागतिक बुद्धिबळ जगज्जेता होण्याचा मान पटकावला आहे. चीनच्या डिंग लिरेनचा अटीतटीच्या लढतीत त्याने ७.५ विरुद्ध ६.५ असा पराभव केला. लिरेनसारख्या कसलेल्या खेळाडूचा मुकाबला करणं सोपं नव्हतं. आणि त्यातही बुद्धिबळात अभिनव आणि निर्भिड चाली रचत गुकेशने वेगळ्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं. १४ डावांच्या या मुकाबल्यात अगदी शेवटच्या क्षणी बरोबरीची कोंडी भेदून गुकेशने विजय मिळवला.

आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवीने तसंच कामगिरीने मोठ्या असलेल्या डिंग लिरेनचा मुकाबला गुकेशला करायचा होता. आणि इथे त्याची मानसिक कसोटीही लागली. बुद्धिबळातील डावपेचांसाठी तो विश्वनाथन आनंदची मदत घेत होता. तसंच मानसिक कणखरतेसाठी तो क्रिकेट तज्ञ पॅडी अपटन यांचा व्यावसायिक सल्ला घेत होता. गुकेशने (D Gukesh) जगज्जेतेपदाची तयारी कशी केली हे आता खुद्द अपटन यांनीच सांगितलं आहे.

(हेही वाचा – Border-Gavaskar Test, Melbourne Test : मेलबर्न कसोटीतही भारतासमोर फलंदाजीच्याच समस्या)

प्रत्येक आठवड्याला ९० मिनिटांचं एक सत्र अपटन गुकेशसाठी (D Gukesh) घेत होते. ‘विजय टप्प्यात असताना उत्सुकता किंवा भीती यांचा अंमल स्वत:वर चढू देऊ नकोस. समोरच्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत कर. लख्याकडे एक एक पाऊल टाक, भराभर वाट चालू नको,’ असं अपटन यांनी वारंवार गुकेशला सांगितलं होतं.

‘शेवटच्या डावात संगणकानेही सामना बरोबरीत सुटेल अशी ९८ टक्के शक्यता व्यक्त केली होती. पण, गुकेश (D Gukesh) प्रयत्न करत राहिला आणि तीच त्याची खासियत आहे. विजय त्याने खेचून आणला,’ असं अपटन म्हणाले. १९ वर्षीय गुकेशसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आता कुठे खुलं झालं आहे. आता त्याच्यासाठी पुढचा मोठा टप्पा असणार आहे तो पुढील वर्षी मॅग्नस कार्लसनशी होणारी लढत. नॉर्वे क्लासिक चेस अंतर्गत मे-जून २०२५ मध्ये ही लढत होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.