FIDE Chess World Cup : गुकेश, प्रज्ञानंद आणि अर्जुन हे तिघे भारतीय बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीत

युवा बुद्धिबळपटूंची ही कामगिरी दमदार आहे

174
FIDE Chess World Cup : गुकेश, प्रज्ञानंद आणि अर्जुन हे तिघे भारतीय बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीत
FIDE Chess World Cup : गुकेश, प्रज्ञानंद आणि अर्जुन हे तिघे भारतीय बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीत
  • ऋजुता लुकतुके

बुद्धिबळ विश्वचषकात गुकेश बरोबरच प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगसी यांनी उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. युवा बुद्धिबळपटूंची ही कामगिरी दमदार आहे. गुकेशची गाठ आता मॅग्नस कार्लसनशी पडणार आहे. फिडेची बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा मानाची समजली जाते. या स्पर्धेत यंदा तीन युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीची दखल घ्यायला लावली आहे. अलीकडेच क्रमवारीत पहिल्या दहात पोहोचलेला डी गुकेश, प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगसी असे तीन भारतीय खेळाडू स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत पोहोचले आहेत. भारतीय संघासाठी स्पर्धेतील ही आतापर्यंतची सगळ्यात उजवी कामगिरी मानावी लागेल.

गुकेशनं रविवारी चीनच्या वँग हाओला १.५ विरुद्ध ०.५ गुणांनी पराभूत केलं. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना त्याने विजय साकारला. तर काळ्या मोहऱ्यांनी खेळताना झटपट बरोबरी मान्य केली. आता गुकेशचा मुकाबला अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसनशी होणार आहे. स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाल्यापासून गुकेश विरुद्ध कार्लसन या संभाव्य लढतीची चर्चा होत होती. दुसरीकडे, प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगसी एकाच ड्रॉमध्ये आहेत. त्यामुळे उपउपांत्य फेरीत याच दोघांची एकमेकांशी गाठ पडेल. पण, त्यामुळे किमान एक भारतीय खेळाडू स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिसेल हे स्पष्ट झालं आहे.

अर्जुन एरिगसीने निल्स ग्रँडिलस विरुद्ध खेळताना फारसा धोका पत्करला नाही. झटपट बरोबरी मान्य करून त्याने उपउपांत्य फेरीतला प्रवेश नक्की केला. त्यामुळे या स्पर्धेत ही मजल मारणारा तो तिसरा भारतीय ठरला.

(हेही वाचा – Prithviraj Chavan : भाजपाकडून शरद पवारांना कृषी मंत्री आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर – पृथ्वीराज चव्हाण)

भारतासाठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे विदित गुजराथी आणि हरिका या आणखी दोन खेळाडूंचं स्पर्धेतील भवितव्य सोमवारी ठरणार आहे. दोघांची आधीच्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली आहे. पैकी विदितची लढत रशियाचा जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या ईयन नेपोमिनिएची यांच्याशी होती. पण, ४९ चालींमध्ये हा सामना विदितने बरोबरीत सोडवला. त्यामुळे विदितला आता पुन्हा टायब्रेकर सामना खेळावा लागणार आहे. तसंच हरिकालाही टायब्रेकर खेळायचा आहे. दोघांनी सोमवारी आपल्या लढती जिंकल्या तर एकाच विश्वचषक स्पर्धेत तब्बल पाच भारतीय उपउपांत्य फेरीत मजल मारतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.