David Beckham Meets Rohit Sharma : डेव्हिड बेकहम आणि रोहीत शर्मा जेव्हा एकमेकांना आपल्या संघाची जर्सी भेट देतात

248
David Beckham Meets Rohit Sharma : डेव्हिड बेकहम आणि रोहीत शर्मा जेव्हा एकमेकांना आपल्या संघाची जर्सी भेट देतात

ऋजुता लुकतुके

भारतीय संघ बुधवारी मुंबईत न्यूझीलंडबरोबर अंतिम सामना खेळला. या सामन्यासाठी दिग्गज इंग्लिश फुटबॉलपटू (David Beckham Meets Rohit Sharma) डेव्हिड बेकहम हजर होता. भारतीय संघाची भेट घेतल्यानंतर बेकहमने दुसऱ्या दिवशी आपल्या फेसबुक अकाऊंटवर या भेटी दरम्यानचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात बेकहम भारतीय संघाची ४५ क्रमांकाची जर्सी घालून उभा आहे. आणि जर्सीवर रोहीत असं नावही आहे. तर शेजारी रोहीत शर्माने डेव्हिड बेकहमची रियाल माद्रिद जर्सी घातली आहे.

बेकहमने (David Beckham Meets Rohit Sharma) फुटबॉल लीगमध्ये २३ क्रमांकाची जर्सी घालून हा क्रमांक लोकप्रिय केला होता. दोघांचा एकत्र फोटो टाकताना बेकहमने लिहिलंय, ‘कॅप्टन, तुला भेटून खूप आनंद झाला. अंतिम सामन्यासाठी तुला शुभेच्छा.’

(हेही वाचा – Ind vs Aus Final : अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादेत वायूदलाचा एअर शो)

रोहीतने सुरुवातीच्या षटकांमध्ये (David Beckham Meets Rohit Sharma) षटकार खेचण्याच्या आपल्या हातोटीमुळे हिटमॅन हा किताब मिळवला आहे. आणि ४६१ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने १८,१९१ धावा केल्या आहेत. यात ४५ शतकं आणि १०० अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहीतने २६१ सामन्यांत १०,६६२ धावा केल्या आहेत. इथं ३१ शतकं आणि ५५ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.

(हेही वाचा – Public Holidays : नवीन वर्ष सुट्ट्यांचे, वाचा यादी)

कप्तान म्हणूनही रोहीत शर्मा (David Beckham Meets Rohit Sharma) यशस्वी ठरला आहे आणि दोन आशिया चषकांमध्ये त्याने भारताला विजेतेपदं मिळवून दिली आहेत. दुसरीकडे, डेव्हिड बेकहम युनिसेफचा सदिच्छा दूत म्हणून भारतात आला आहे. आयसीसीने या विश्वचषकासाठी युनिसेफबरोबर सहकार्य करार केला आहे. महिला आणि मुलींचं शिक्षण तसंच सक्षमीकरण आणि लिंग समानता यासाठी क्रिकेटच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा संकल्प आयसीसीने सोडला आहे. (David Beckham Meets Rohit Sharma)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.