- ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) एक महत्त्वाचा टप्पा गाठताना तीनही प्रकारात १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा मान मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यानचा पहिला टी-२० हा वॉर्नरचा १००वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होता. ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा एरॉन फिंच आणि ग्लेन मॅक्सेवल यांच्या नंतरचा फक्त तिसरा क्रिकेटपटू आहे. इतकंच नाही तर जागतिक स्तरावर विराट कोहली आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर हे दोनच खेळाडू असे आहेत जे तीनही प्रकारात शंभर सामने खेळले आहेत. (David Warner)
David Warner creates history with as the first player to represent Australia 100 times in all three formats as the West Indies bowl first in the first T20 in Hobart!#AUSvWI @jackpayn https://t.co/qwFUXtM2Fc
— cricket.com.au (@cricketcomau) February 9, 2024
(हेही वाचा – Doctor Dismissed : सरकारी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई)
डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत ‘इतके’ सामने खेळला आहे
ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श कोव्हिड १९ झाल्यामुळे काही दिवस विलगीकरणात होता. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीसाठीही वॉर्नरच मैदानावर आला. आणि त्याने नाणेफेक जिंकलीही. पण, नंतरच्या सामन्यासाठी मार्श मैदानात हजर होता. वॉर्नरने आपल्या १००व्या टी-२० सामन्यात सलामीला खेळताना ७० धावाही केल्या. ३६ चेंडूंत ७० धावा करताना त्याने १२ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ७ बाद २१३ अशी धावसंख्या उभारली. आणि उत्तरादाखल वेस्ट इंडिजला ८ बाद २०२ धावाच करता आल्या. (David Warner)
त्यामुळे पहिला टी-२० सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. डेव्हिड वॉर्नर आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी १०० टी-२०, १६१ एकदिवसीय सामने आणि ११२ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने जवळ जवळ १९,००० आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. अलीकडेच एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून त्याने निवृत्ती पत्करली आहे. आणि टी-२० क्रिकेट तो अजूनही खेळत आहे. (David Warner)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community