David Warner : डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वावरील बंदी हटली

David Warner : चेंडू कुरतडल्याच्या आरोपावरून डेव्हिड वॉर्नरवर ही बंदी लादण्यात आली होती. 

74
David Warner : डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वावरील बंदी हटली
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये कुठलीही नेतृत्वाची भूमिका वठवण्यासाठी डेव्हिड वॉर्नरवर (David Warner) घालण्यात आलेली बंदी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हटवली आहे. २०१८ मध्ये वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असताना चेंडू कुरतडल्याचा आरोप काही गोलंदाजांवर झाला होता. त्यानंतर हा कट रचण्यासाठी वॉर्नरलाही जबाबदार धरण्यात आलं आणि त्याच्यावर कुठल्याही स्तरावर संघाचं नेतृत्व करता येणार नाही, अशी शिक्षा त्याला झाली होती. अलीकडे वॉर्नरने तीन जणांच्या एका समितीसमोर आपली बाजू मांडली. आणि या समितीने त्याला आता क्लिनचिट दिली आहे.

(हेही वाचा – Assembly Election : मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडी कडून केवळ ६० टक्केच जागांवर उमेदवार निश्चित)

‘वॉर्नरची (David Warner) आताची भाषा बदललेली आहे. तो सन्मानाने वागत आहे. दुसऱ्यांना सन्मानाने वागवतोय. आणि आधी घडलेल्या गोष्टींची जबाबदारी उचलायलाही तो तयार आहे,’ असं म्हणत या समितीने वॉर्नरच्या बाजूने कौल दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष निक हॉकली यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘आपल्यावर झालेल्या कारवाईचा फेरआढावा घ्यावा अशी विनंती त्याने केली. आपण बदललोय हे समितीला पटवून दिले. त्यामुळेच त्याची सुटका झाली आहे. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये तो नेतृत्वाच्या भूमिका बजावू शकतो याचा मला आनंद झालाय. वॉर्नरने पुढाकार घेऊन हे घडवून आणलं,’ असं हॉकले म्हणाले.

(हेही वाचा – Pune News : पुणे पोलिसांना नाकाबंदीत सापडला सोन्याने भरलेला ट्रक; १३८००००००० चा ऐवज जप्त)

चेंडू कुरतडण्याचं प्रकरण २०१८ मध्ये घडलं होतं. स्टिव्ह स्मिथ तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. कॅमेरुन बेनक्रॉफ्ट गोलंदाजी करत असताना वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट यांनी सँडपेपरने चेंडू घासला होता. त्यामुळे वॉर्नरवर (David Warner) एका वर्षाची बंदी आणि कुठल्याही प्रकारचं नेतृत्व करण्यावर बंदी आली होती. वॉर्नरने या विरोधात अपील करताना सध्याचा कर्णधार पॅट कमिन्स, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि ऑस्ट्रेलियन मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचं शिफारसपत्र जोडलं होतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.