१०० व्या कसोटी सामन्यात २०० धावा! सचिनशी बरोबरी करत वॉर्नरने केले अनेक रेकॉर्ड

153

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा कसोटी सामना सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डेव्हिड वॉर्नरचा हा १०० वा कसोटी सामना होता. या १०० व्या सामन्यात वॉर्नरने २५४ चेंडूंमध्ये २०० धावा केल्या. या दरम्यान त्याने १६ चौकार आणि २ षटकार मारले.

( हेही वाचा : बेस्टच्या टेबल टेनिस स्पर्धेमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाची सरशी!)

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी इंग्लंडच्या जो रुटने १०० व्या कसोटी सामन्यात २१८ धावांची इनिंग खेळली होती.

सचिन तेंडुलकरशी बरोबरी

डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीवीर म्हणून ४५ वे शतक झळकावले. सचिनने तेंडुलकरने सुद्धा आपल्या कारकिर्दीत ४५ शतके सलामीवीर म्हणून झळकावली आहेत.

वॉर्नरची कामगिरी

  • डेव्हिड वॉर्नरने कसोटीपूर्वी एकदिवसीय (वन डे) १०० व्या सामन्यातही शतक झळकावले होते.
  • पाच वर्षांनंतर त्याने आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावून इतिहास रचला.
  • कसोटी कारकिर्दीमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.