ऋजुता लुकतुके
या आठवड्यात ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान बरोबर मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळेल तेव्हा संघातील एक यशस्वी आणि दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा (David Warner Retired) हा शेवटचा कसोटी सामना असेल. त्यामुळे सिडनी क्रिकेट ग्राऊंड आपल्या या लाडक्या क्रिकेटपटूला निरोप देण्याची तयारी करत आहे. योगायोगाने १२ वर्षांपूर्वी याच मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध डेव्हिड वॉर्नर आपला पहिला कसोटी सामना खेळला होता.
३७ वर्षीय वॉर्नरने १११ कसोटींत ८,६९५ धावा केल्या आहेत त्या ४४.५८ च्या सरासरीने. यात २६ शतकं तर ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय स्लिपमध्ये चांगले झेल पकडण्याची हातोटी असलेल्या वॉर्नरच्या नावावर ८१ झेलही जमा आहेत.
At the ground where he scored 912 Test runs, and made his T20I debut all those years, David Warner bids farewell to the MCG for one final time #AUSvPAK pic.twitter.com/0XQ6O74meH
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2023
वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात यशस्वी सलामीवीर मानला जातो. पण, अलीकडे त्याच्या निवृत्तीवरून खूपच चर्चा सुरू होती. खासकरून ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर तर वॉर्नर निवृत्त होणार का, यावर संघातच चर्चा रंगली होती. आणि वॉर्नरने ‘आपल्यात अजून क्रिकेट बाकी असल्याचं,’ ठासून सांगितलं होतं.
(हेही वाचा-Ind vs SA 2nd Test : भारतीय संघ ‘अशी’ करतोय दुसऱ्या कसोटीची तयारी )
ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्रयू मॅकडोनाल्ड यांनी मात्र वॉर्नरला पाठिंबा जाहीर केला होता. आताही मॅकडोनाल्ड मीडियाशी बोलताना म्हणाले की, ‘वॉर्नर हा तीनही प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. आणि त्याच्या निवृत्तीनंतर संघात पोकळी निर्माण होणार आहे.’
मागची ३ वर्षं मात्र वॉर्नरची कामगिरी फारशी सातत्यपूर्ण नाही. उलट २०१९ मध्ये चेंडूशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून वॉर्नर आणि तेव्हाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांच्यावर १ वर्षाची बंदीही घालण्यात आली होती. त्यामुळे वॉर्नरची कारकीर्द एरवी गौरवशाली असली तरी चेंडू कुरतडण्याचा आरोप आणि अलीकडच्या काळात त्याचा घसरलेला फॉर्म हा त्याच्या कारकीर्दीवरील काळा डाग मानला जाईल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community