सिराजच्या बाऊन्सरवर जखमी झाला अन् थेट ऑस्ट्रेलियाला गेला, कसोटी मालिकेतून माघार

भारताने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत आपले स्थान कायम राखले आहे. परंतु ऑस्ट्रेलियन संघासमोरील आव्हाने मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे बॉर्डर गावस्कर मालिकेतून बाहेर पडला आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्र सत्तासंघर्ष: जाणून घ्या कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील काही महत्त्वाचे मुद्दे)

कसोटी मालिकेतून माघार 

दुसऱ्या कसोटीदरम्यान डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाली होती. टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजचा बॉल थेट वॉर्नरच्या हेल्मेटला लागला यानंतर तो क्रिजवर उभा राहिला पण काही वेळातच त्याच्या कोपराला सुद्दा बॉल लागला आणि त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. वॉर्नरला फिट होण्यासाठी आता काही आठवडे लागू शकतात. त्यामुळे वॉर्नरने कसोटी मालिकेतून माघार घेत, तो ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. पहिल्या दोन कसोटीत डेव्हिड वॉर्नरला फारसे यश आले नाही त्याने केवळ २६ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन सुद्धा पहिल्या कसोटीमधून बाहेर झाले आहेत. या दोघांच्या बोटाला दुखापत झाली होती. आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी १ मार्चपासून सुरू होईल आणि चौथी कसोटी मालिका अहमदाबाद येथे ९ ते १३ मार्च दरम्यान खेळवण्यात येईल. या मालिकांमध्ये भारताला विजय मिळवणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here