- ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अलीकडेच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. पण, टी-२० प्रकारात तो खेळत राहणार आहे. आताही तो ऑस्ट्रेलियातील टी-२० लीग अर्थात, बिग बॅश खेळण्यात व्यस्त आहे. शुक्रवारी सामना होता तो सिडनी थंडर्स आणि सिडनी सिक्सर्स या संघादरम्यान. (David Warner)
आणि या सामन्यासाठी वॉर्नर (David Warner) चक्क हेलिकॉप्टरमधून मैदानात उतरला. झालं असं की, त्याच्या भावाचं लग्न होतं. त्यामुळे ते आटोपून तू थेट सामन्याच्या काही मिनिटं आधी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर उतरला. मैदानाच्या आऊटफिल्डवर जिथे त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यावेळी ‘थँक यू डेव,’ असा संदेश लिहिलेला होता, तिथेच वॉर्नर उतरला. (David Warner)
David Warner has arrived…#BBL13 pic.twitter.com/P94Um9AxNF
— Nic Savage (@nic_savage1) January 12, 2024
(हेही वाचा – Eknath Shinde : उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना घरगडी, नोकर समजतात; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल )
सामन्यापूर्वी चॅनल सेव्हनशी याविषयी त्याने बातचितही केली. ‘मला शक्य होतं, ते सगळं करून या सामन्यासाठी आलो आहे. आता संघासाठी धावा करायच्या आहेत,’ असं तो म्हणाला. या सामन्यात त्याच्या प्रतिस्पर्धा सिडनी सिक्सर्स संघात त्याचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथही होता. (David Warner)
स्टिव्ह स्मिथला स्लेजिंग करतानाचा वॉर्नरचा व्हिडिओही नंतर प्रसिद्ध झाला होता. आणि या सामन्यात विजयाचं दानही स्मिथच्या सिडनी सिक्सर्स संघाच्या बाजूने पडलं. स्मिथ शून्यावर बाद झाला असला तरी त्याच्या संघाने २० षटकांत १५१ धावा केल्या. आणि त्याला उत्तर देताना चांगल्या सुरुवातीनंतरही सिडनी थंडर्सचा संघ १३२ धावांत गुंडाळला गेला. वॉर्नरने ३७ धावांचं योगदान दिलं. या स्पर्धेत सिडनी थंडर्संचं आव्हान संपल्यात जमा आहे. (David Warner)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community