-
ऋजुता लुकतुके
टेनिसमधील मानाच्या सांघिक स्पर्धेत अर्थात डेव्हिस चषक स्पर्धेत इटलीने बाजी मारली आहे. तब्बल ४७ वर्षांनंतर इटलीने हा मान पटकावला. (Davis Cup Tennis)
डेव्हिस चषकाच्या उपांत्य लढतीत नोवाक जॉकोविचच्या सर्बिया संघाला हरवल्यानंतर इटलीने आपला धडाका कायम राखत ऑस्ट्रेलियाचाही २-० असा पराभव केला आणि त्याचबरोबर डेव्हिस चषक स्पर्धेत तब्बल ४७ वर्षांनंतर विजेतेपद पटकावलं. जॅनिक सिनर इटलीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. (Davis Cup Tennis)
अंतिम लढतीत परतीच्या एकेरी सामन्यात सिनरने ऑस्ट्रेलियन ॲलेक्स डी मिनॉरचा ६-३ आणि ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर पहिल्या एकेरीत मॅटो आरनाल्डीने ॲलेक्साई पॉपिरिनचा ७-५, २-६ आणि ६-४ असा पराभव केला होता. (Davis Cup Tennis)
🇮🇹 WORLD CHAMPIONS 🇮🇹
Italy win the #DavisCup for the first time in 47 years!#DavisCupFinals pic.twitter.com/Mij48Q9w83
— Davis Cup (@DavisCup) November 26, 2023
जेनेक सिनर या स्पर्धेत कमालीच्या फॉर्ममध्ये होता. उपांत्य लढतीत बलाढ्य सर्बियाचा इटलीने पराभव केला तो सिनरच्याच जोरावर. कारण, सिनरने जागतिक क्रमवारीत अव्वल जॉकोविचचा दोनदा पराभव केला होता. स्वत: सिनर क्रमवारीत सध्या बाराव्या स्थानावर आहे. पण, आधी जोकोविच आणि आता डी मनोर विरुद्ध त्याने निर्विवाद वर्चस्व राखलं. त्याचे ग्राऊंड स्ट्रोक अप्रतिम होते. (Davis Cup Tennis)
It’s party time for Team Italy 🇮🇹🎉#DavisCupFinals | @federtennis pic.twitter.com/MRUYpuXMs6
— Davis Cup (@DavisCup) November 26, 2023
(हेही वाचा – Agri koli Bhavan : दहिसरमध्ये उभारणार आगरी कोळी भवन)
इटलीचं हे दुसरं डेव्हिस चषक विजेतेपद आहे आणि तब्बल ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी ते मिळवलंय. त्यामुळे बक्षीस समारंभानंतर संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एकच जल्लोष झाला. खरंतर या स्पर्धेत साखळी सामन्यांमध्ये झालेल्या सलग पराभवांमुळे इटलीचा संघ स्पर्धेतून बाद होण्याच्या वाटेवर होता. पण, जेनेक सिनर आणि अरमाल्डी यांनी संघाला विजय वाटेवर आणलं. आणि आता विजेतेपदही मिळवून दिलं आहे. (Davis Cup Tennis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community