माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला मागे सारून डी गुकेश बनला भारताचा अग्रमानांकीत बुद्धिबळपटू

162
Gukesh D : भारताचा अव्वल बुद्धिबळपटू गुकेश डी बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
Gukesh D : भारताचा अव्वल बुद्धिबळपटू गुकेश डी बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

ऋजुता लुकतुके

विश्व बुद्धिबळ फेडरेशनच्या ताज्या क्रमवारीत गुकेशनं विश्वनाथन आनंदलाही मागे टाकून भारताचा अव्वल बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे गुकेश फक्त १७ वर्षांचा आहे. नवीन क्रमवारीत तो जगातील अव्वल दहांमध्ये पोहोचण्याचीही दाट शक्यता आहे.

माजी जगजेत्ता आणि भारताचा आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदच्या (Vishwanathan Anand) देशातील मक्तेदारीला त्याच्याच राज्यातल्या एका युवा बुद्धिबळपटूने आव्हान दिलं आहे. डी गुकेशने (GM D Gukesh) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशन अर्थात फिडेच्या (FIDE) ताज्या लाईव्ह क्रमवारीत आनंदला मागे टाकून देशात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

बुद्धिबळ विश्वचषकाच्या (Chess World Cup) दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिस्त्रादिन इस्कानदारोव्हला (Mistradin Iskandarov) हरवल्यानंतर गुकेश आता क्रमवारीत आनंदच्याही वर आहे. फिडेची आणखी एक क्रमवारी सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध होईल. आणि तोपर्यंत गुकेशनं फॉर्म कायम राखला तर तो जागतिक क्रमवारीत पहिल्या दहांत पोहोचेल. आनंद नंतर तिथपर्यंत पोहोचणारा तो दुसरा भारतीय ठरेल.

फिडेच्या लाईव्ह क्रमवारीत गुकेशचे आता २७५५.९ गुण झाले आहेत. तर विश्वनाथन आनंद २७५४.० गुणांवर आहे. इस्कानदारोव्हववर सरळ विजय मिळवल्यामुळे गुकेशला अडीच गुण मिळाले. आणि त्याचा फायदा त्याला झाला. फिडे संघटनेनं काल (३ ऑगस्ट) उशिरा ट्विट करून ही माहिती दिली. आणि गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.

(हेही वाचा – केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये दरड कोसळली; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता)

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनीही केलं अभिनंदन

गुकेशचं जाहीर अभिनंदन करणारे पहिले व्यक्ती होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन. (M K Stalin) त्यांनी फिडेचं ट्विट शेअर केलं. यात त्यांनी म्हटलं की, तुझं कौशल्य आणि निर्धार यामुळेच हे यश तुला मिळालं आहे. तुझ्या या कामगिरीमुळे राज्यातील इतर होतकरू मुलांनाही प्रेरणा मिळेल. तामिळनाडूसाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.

गुकेश विश्वनाथन आनंदलाच आपला आदर्श मानतो. आनंदने १९८६ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. आणि १९८७ पासून आनंद क्रमवारीनुसार देशातला अव्वल मानांकित बुद्धिबळपटू होता. १९९१ मध्ये तो सर्वप्रथम जगातल्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये पोहोचला. त्यानंतर पहिल्यांदा देशातल्या आनंदच्या वर्चस्वाला धक्का पोहोचला आहे. गुकेश बरोबरच आणखी एक बुद्धिबळपटू आर प्रगानंदा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.