- ऋजुता लुकतुके
चीनचा ज्युनिअर बॅडमिंटनपटू झँग झिजिएच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचा निर्णय जागतिक बॅडमिंटन संघटनेनं घेतला आहे. झँग इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर बॅडमिंटन विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेदरम्यान अचानक कोर्टवर कोसळून मृत्युमुखी पडला होता. इंडोनेशियन बॅडमिंटन असोसिएशन आणि बॅडमिंटन आशिया या संघटनाने नंतर जारी केलेल्या पत्रकानुसार, झँगला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, संध्याकाळी त्याला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. (Death of Young Badminton Player)
Nothing to see here.
17-year-old Chinese badminton player Zhang Zhijie goes into Cardiac Arrest and dies as he collapsed on the court during a tournament in Indonesia. pic.twitter.com/zb22r5MluB
— Liz Churchill (@liz_churchill10) July 1, 2024
स्पर्धेच्या ठिकाणी झँगला तातडीने मदत मिळाली का आणि तिथे उपलब्ध असलेले डॉक्टर किंवा प्रथमोपचार करणारे अधिकारी तिथे किती वेळात पोहोचले यावरून मात्र आयोजकांवर टीका होत आहे. कारण, वरील व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की, झँग कोसळल्यानंतर ४० सेकंदांनी त्याला तज्ज्ञांची मदत मिळाली. त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास यंत्रणा त्यासाठी सज्ज होती का, असा प्रश्न विचारला जात आहे. (Death of Young Badminton Player)
त्यामुळेच आता जागतिक बॅडमिंटन संघटनेनं या प्रकरणाची सखोल चौकशी करत असल्याचं पत्रक मंगळवारी जारी केलं आहे. (Death of Young Badminton Player)
📢 Updated BWF statement pic.twitter.com/KITm5I3dQ3
— BWF (@bwfmedia) July 2, 2024
(हेही वाचा – Ambadas Danve Suspension: दानवे यांची शिवीगाळ; ठाकरेंची माफी… तरी ट्रोल का झाले?)
तर इंडोनेशियाच्या बॅडमिंटन संघटनेनं या बाबतीत रेफरींवर बोट दाखवलं आहे. ‘आपत्कालीन परिस्थितीतील नियम आम्ही पूर्णपणे पाळले आहेत. रेफरी जोपर्यंत इशारा करत नाहीत, तोपर्यंत त्रयस्थ व्यक्ती कोर्टवर जाऊ शकत नाही, तिथेच थोडा वेळ गेला,’ असं असोसिएशनचं म्हणणं आहे. (Death of Young Badminton Player)
आता जागतिक संघटनेकडून या दावे-प्रतिदाव्यांचा तपास होणार आहे. दरम्यान, आजी-माजी खेळाडू बॅडमिंटनच्या व्यस्त वेळापत्रकालाही दोष देत आहेत. दोन स्पर्धांमध्ये पुरेसं अंतर असावं अशी मागणी होत आहे. (Death of Young Badminton Player)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community