Deepak Chahar : दीपक चहर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकणार?

घरातील जवळची व्यक्ती आजारी असल्यामुळे दीपक चहर अजून दक्षिण आफ्रिकेतच आलेला नाही. 

203
Deepak Chahar : दीपक चहर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकणार?
Deepak Chahar : दीपक चहर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकणार?
  • ऋजुता लुकतुके

घरातील जवळची व्यक्ती आजारी असल्यामुळे दीपक चहर (Deepak Chahar) अजून दक्षिण आफ्रिकेतच आलेला नाही. (Deepak Chahar)

भारताचा तेज गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) अजून टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेला नाही. त्यामुळे दरबनच्या पहिल्या सामन्यासाठी त्याचा विचार होऊ शकला नाही आणि आता तो अख्ख्या टी२० मालिकेला मुकण्याची चिन्हं आहेत. घरातील एका जवळच्या व्यक्तीच्या आजारपणामुळे तो काही दिवस क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचं बोललं जात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पाचवा आणि शेवटचा टी-२० सामनाही तो खेळला नव्हता. (Deepak Chahar)

‘या’ कारणास्तव चहर फिरला माघारी

मागच्या रविवारी बंगळुरूमध्ये संघाबरोबर असताना त्याला घरून एक फोन आला आणि त्यानंतर तो घरी गेला आहे. ‘दीपकच्या घरातील जवळची व्यक्ती रुग्णालयात आहे. त्यामुळे दीपकने बीसीसीआयकडून परवानगी घेऊन ही सुटी घेतली आहे. तो खेळण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्याला ही परवानगी देण्यात आली आहे. सध्या तो दक्षिण आफ्रिकेत नाही. आणि येत्या दोन दिवसांत तिथे पोहोचण्याची शक्यताही कमीच आहे,’ असं बीसीसीआयमधील एका पदाधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. (Deepak Chahar)

(हेही वाचा – Veer Savarkar: सावरकर कुळातील वीरांगनांची शौर्यगाथा उलगडणारा एकपात्री नाट्यप्रयोग !)

‘ही’ आहे चहरची सर्वोत्तम कामगिरी

३१ वर्षीय दीपक चहर (Deepak Chahar) हा टी-२० संघातील भारताचं एक महत्त्वाचं अस्त्र मानला जातो. या प्रकारात तो एक यशस्वी गोलंदाज आहे आणि ७ धावांत ६ बळी ही त्याची या प्रकारातील सर्वोत्तम कामगिरी आहे. मागचे दोन वर्षं दुखापतीमुळे तो संघात नियमितपणे खेळत नाहीए. त्याचा फटका भारतीय संघाला बसला आहे. (Deepak Chahar)

दीपक (Deepak Chahar) बरोबरच शुभमन गिल (Shubman Gill) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) हे दोन खेळाडूही भारतीय संघाबरोबर दक्षिण आफ्रिकेत पोहोचले नव्हते. दोघं आपल्या कुटुंबीयांबरोबर परदेशात सहलीवर होते. पण, आता ते संघाबरोबर दाखल झाले आहेत आणि पहिल्या टी-२० सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातही दोघं सहभागी झाले होते. (Deepak Chahar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.