- ऋजुता लुकतुके
एकेकाळची जगातील अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी केंद्र सरकारच्या टॉप्स योजनेत सहभागी झाली आहे. तिरंदाजीतील पुनरागमनानंतर आता तिचा प्रयत्न आहे तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा. आणि त्यासाठीच तिला आर्थिक मदत मिळावी यासाठी क्रीडा मंत्रालयाने तिला पुन्हा एकदा टॉप्स योजनेत घेतलं आहे. सोमवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला. (Deepika Kumari in TOPS)
डिसेंबर २०२२ पासून दीपिकाने मातृत्वाची रजा घेतली होती. त्यानंतर यावर्षी तिने सरावाला पुन्हा सुरुवात केली. आणि पहिल्याच शांघाय विश्वचषक स्पर्धेत तिने रिकर्व्ह प्रकारात रौप्य जिंकलं. यापूर्वी तीनवेळा दीपिका ऑलिम्पिक खेळलेली आहे. आणि पुनरागमनानंतर तिने आशियाई क्रीडास्पर्धेतही चांगली कामगिरी केली आहे. (Deepika Kumari in TOPS)
🥇 for men’s recurve team!
🥈 for Deepika Kumari!!The Indian archery contingent enjoys a fine day at the Archery World Cup 2024 in Shanghai.#ArcheryWorldCup pic.twitter.com/KAiL4bfy5C
— Olympic Khel (@OlympicKhel) April 28, 2024
(हेही वाचा – Ayushman Bharat : काय आहे आयुष्यमान भारत दिनाचे महत्व?)
भारतीय तिरंदाजांसाठी आता खूपच कमी संधी
तिरंदाजांपैकी एकटा धीरज बोमेदेवरा हा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. गेल्यावर्षी झालेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत त्याने पात्रतेचा निकष पूर्ण केला. बाकी भारतीय तिरंदाजांसाठी आता खूपच कमी संधी उरल्या आहेत. १५ आणि १६ जूनला टर्कीच्या अंतालया इथं ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होणार आहे. ही शेवटची संधी खेळाडूंसाठी आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठीच दीपिका कुमारीला सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. ती सरावासाठी थोडं आधी टर्कीला जाऊ शकते. (Deepika Kumari in TOPS)
आणखी एक तिरंदाज प्रवीण जाधवलाही टॉप्सच्या मुख्य गटात समाविष्ट करण्यात आलं आहे. तर २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये स्क्वॉश खेळाचा समावेश करण्यात आला आहे. आणि बघता, अनाहत सिंग, अभय सिंग आणि वेलावल सेंथिलकुमार या स्क्वॉशपटूंनाही टॉप्सच्या उगवत्या खेळाडूंच्या गटात घेण्यात आलं आहे. (Deepika Kumari in TOPS)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community