Rohit Sharma : निवड समिती रोहित शर्मावर कसोटी कर्णधार म्हणून विश्वास दाखवेल?

Rohit Sharma : भारतीय संघ आता थेट जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळेल.

44
Rohit Sharma : निवड समिती रोहित शर्मावर कसोटी कर्णधार म्हणून विश्वास दाखवेल?
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत खराब कामगिरीनंतरही रोहित शर्मावरच (Rohit Sharma) इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून विश्वास दाखवला जाईल असं दिसतंय. पीटीआय वृत्तसंस्थेनं तशी बातमी दिली आहे. ‘न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांमध्ये कर्णधार म्हणून आणि खेळाडू म्हणूनही फ्लॉप ठरल्यानंतरही रोहीतवर इंग्लंड दौऱ्यासाठी रोहितच कर्णधार असेल,’ असं या बातमीत म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ कसोटींमध्ये मिळून रोहितने (Rohit Sharma) ३१ धावा केल्या. खराब फॉर्ममुळे शेवटच्या कसोटींत त्याने स्वत:लाच वगळलं होतं. पण, चॅम्पियन्स करंडकात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतर निवड समितीने पुन्हा एकदा रोहितवर विश्वास दाखवायचं ठरवलं आहे.

आयपीएलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत इंग्लंड दौऱ्यासाठीचा संघ जवळ जवळ निश्चित झालेला असेल असंही पीटीआयने बातमीत म्हटलं आहे. ‘आयपीएलची बाद फेरी सुरू होईल तोपर्यंतचा वेळ निवड समितीकडे असेल. खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेऊन मग त्याच आठवड्यात इंग्लंडसाठीचा लंघ निवडला जाईल,’ असं पीटीआयला बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं आहे.

(हेही वाचा – Crop Insurance : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई मिळणार)

त्याचवेळी भारतीय संघातील काही ज्येष्ठ खेळाडू मुख्य दौऱ्याआधी इंग्लंडमध्ये होणाऱ्या भारतीय अ संघाच्या दौऱ्यातही सहभागी होतील असे संकेत आहेत. इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हा पर्याय सुचवला आहे. ते स्वत: भारतीय अ संघाबरोबर या दौऱ्यावर जाणार आहेत असं बोललं जातंय. भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंडचा कसोटी दौरा करणार आहे आणि यात पहिला कसोटी सामना २० जूनला हेडिंग्ले इथं होणार आहे. २००७ नंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेला नाही. ती कसर यावेळी भरून काढण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. ४५ दिवसांच्या या दौऱ्यात ५ कसोटी होणार आहेत. (Rohit Sharma)

या मालिकेपूर्वी भारताचा अ संघ इंग्लिश लायन्स संघाविरुद्ध खेळणार आहे आणि अ संघाची पहिली कसोटी ३० मे ला आहे. २५ मे ला आयपीएलची अंतिम फेरी असेल. त्यानंतर लगेचच भारतीय अ संघाला इंग्लंडसाठी रवाना होईल. भारतीय अ संघात रणजी हंगाम गाजवणाऱ्या करुण नायरचा समावेश निश्चित मानला जात आहे. तिथल्या कामगिरीवरून भारताच्या मुख्य संघात त्याच्या समावेशावरही निर्णय होऊ शकतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.