Paris Paralympic : पॅरालिम्पिक खेळांत आशियाई विक्रमांसह धरमवीरला क्लब थ्रोमध्ये सुवर्ण, प्रणवला रौप्य

पॅरालिम्पिक खेळांत आतापर्यंत भारताने ५ सुवर्ण जिंकली आहेत.

88
Paris Paralympic : पॅरालिम्पिक खेळांत आशियाई विक्रमांसह धरमवीरला क्लब थ्रोमध्ये सुवर्ण, प्रणवला रौप्य
Paris Paralympic : पॅरालिम्पिक खेळांत आशियाई विक्रमांसह धरमवीरला क्लब थ्रोमध्ये सुवर्ण, प्रणवला रौप्य
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस इथं सुरू असलेल्या पॅरालिम्पिक (Paris Paralympic) खेळांमध्ये बुधवारचा दिवस भारतासाठी पुन्हा एकदा सुवर्ण यशाचा ठरला. धरमवीर आणि हरविंदर यांनी सुवर्ण जिंकत भारताची सुवर्ण पदकांची संख्या ५ वर नेली. धरमवीरने क्लब थ्रो एफ५१ प्रकारात आशियाई स्तरावरील सर्व विक्रम मोडीत काढत ३४.९२ मीटरच्या फेकीसह सुवर्ण नावावर केलं. विशेष म्हणजे भारताच्याच प्रणव सुरमाने रौप्य पटकावलं. आणि त्यामुळे पहिल्या दोन स्थानांवर दोघे भारतीय असं दुर्मिळ चित्र पाहायला मिळालं. गंमत म्हणजे ३५ वर्षीय धरमिंदरने अंतिम फेरीत पहिले चारही थ्रो चुकीचे केले होते. पण, अखेरच्या संधीत एकदम ३४ मीटरच्या वर फेक करत सुवर्ण नावावर केलं.

(हेही वाचा – Mumbai Crime शाखेची कौतुकास्पद कारवाई, ड्रग्स माफियांना अटक करून काढली वरात)

दुसरा आलेला २९ वर्षीय प्रणव आणि धरमिंदर यांच्या फेकीत फक्त ०.३३ मीटरचा फरक होता. प्रणव १६ वर्षांचा असताना सिमेंटचा मोठा तुकडा डोक्यावर पडून त्याच्या मज्जासंस्थेला मार बसला होता. त्यामुळे तो पायाने अधू झाला आणि तेव्हापासून तो व्हिलचेअरला खिळला. पण, जिद्दीने त्याने खेळात ही मजल मारली आहे. पॅरिसमध्ये पहिल्याच प्रयत्नांत ३४.५९ मीटरची फेक करत धरमिंदरच्या पाठोपाठ त्याने रौप्य नावावर केलं. (Paris Paralympic)

(हेही वाचा – Madrasa मध्ये सापडले संघाला ‘आतंकवादी’ संबोधणारे पुस्तक)

क्लब थ्रो प्रकारात यंदा भारतीय खेळाडूंचंच वर्चस्व दिसून आलं. या प्रकारतील तिसरा भारतीय स्पर्धक अमित कुमार मात्र सात स्पर्धकांमध्ये शेवटचा आला. २०१७ मध्ये अमितने विश्वविजेतेपद पटकावलं होतं. एफ ५१ हा प्रकार हात, पाय किंवा पाठ यांच्या हालचाली मंदावलेल्या खेळाडूंसाठी आहे. खांदे आणि मनगट यांच्या हालचालीतून जी ताकद निर्माण होते त्याच्या जोरावर खेळाडू क्लब फेक करतात.

पॅरिस पॅरालिम्पिक (Paris Paralympic) खेळांचे शेवटचे ३ दिवस आता बाकी आहेत. आणि आतापर्यंत भारतीय पथकाने ५ सुवर्ण, ९ रौप्य आणि १० कांस्य पदकं जिंकली आहेत. आतापर्यंची पॅरालिम्पिक खेळांमधली ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.