Dhoni – Harbhajan Dispute : हरभजन सारखंच आणखी कोणाबरोबर होतं महेंद्र सिंह धोनीचं भांडण?

106
Dhoni - Harbhajan Dispute : हरभजन सारखंच आणखी कोणाबरोबर होतं महेंद्र सिंह धोनीचं भांडण?
Dhoni - Harbhajan Dispute : हरभजन सारखंच आणखी कोणाबरोबर होतं महेंद्र सिंह धोनीचं भांडण?
  • ऋजुता लुकतुके

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट बदललं असं म्हटलं जातं. परदेशात विजयाची सवय धोणीने भारतीय संघाला लावली. अनेक युवा खेळाडूंची कारकीर्दही घडवली. ‘कॅप्टन कूल’ धोनी म्हणून तो आपल्या कारकीर्दीत लोकप्रिय झाला. अशा धोनीबरोबर आपलं भांडण असल्याचं हरभजन सिंगने नुकतंच मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. ‘कारण, धोनीलाच ठाऊक आहे. कारण, माझ्याकडे कारण नाही. पण, आम्ही १० वर्षांत एकमेकांशी काहीच बोललेलो नाही,’ असं हरभजनने नुकतंच म्हटलं होतं. (Dhoni – Harbhajan Dispute)

(हेही वाचा- Harbhajan – Dhoni Dispute : हरभजन आणि धोनी यांच्यात वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली?)

या बातमीनंतर धोनीचं हरभजन व्यतिरिक्त संघातील आणखी कोणा कोणाशी भांडण होतं अशी चर्चाही आता समोर आली आहे. कारण, हरभजनने व्यक्त होण्यासाठी एवढा वेळ घेतला असला तरी आणखी समकालीन दोन क्रिकेटपटूंनी कारकीर्दीच्या उतार वयाने जाहीरपणे धोनीविषयी नाराजी व्यक्त केली होती. ती प्रकरणं नेमकी काय होती पाहूया, (Dhoni – Harbhajan Dispute)

सध्याचा मुख्य प्रशिक्षक असलेला गौतम गंभीर आपल्या कारकीर्दीत तडाखेबाज फलंदाज म्हणून ओळखला जात होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ आणि २०११ असे दोन विश्वचषक जिंकले. या दोन्हीतही गंभीरची कामगिरी उजवी होती. अगदी अंतिम सामन्यातही गंभीरने एक बाजू लावून धरत दमदार कामगिरी केली होती. पण, गंभीरला आपली मतं जाहीरपणे व्यक्त करण्याची सवय होती. आणि त्याने अनेकदा मुलाखतींमधून महेंद्र सिंग धोनीला लक्ष्य केलं आहे. २०११ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोणीने मारलेल्या षटकाराचं कौतुक झालं. पण, गंभीरने तो धोनीचा नाही, तर अख्ख्या संघाचा विजय होता, असं म्हटलं होतं. २०१२ मध्ये धोनीने सेहवाग, तेंडुलकर, गंभीर यांना आलटून पालटून खेळवायचं आणि तरुण रक्ताला संघात वाव द्यायचा असं धोरण ठरवलं होतं. या धोरणावरही गंभीरने टीका केली होती. त्यामुळे संघाचं संतुलन बिघडतं आणि अनुभवी खेळाडूंना डावललं जातं, असं गंभीर तेव्हा म्हणाला होता. (Dhoni – Harbhajan Dispute)

(हेही वाचा- Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस ; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवनही विस्कळीत)

युवराज सिंगनेही महेंद्रसिंग धोनीबरोबर असलेल्या वादांचं सुतोवाच काही मुलाखतींमधून केलं आहे. गेल्याच वर्षी एका पॉडकास्टमध्ये बोलताना युवराज म्हणाला की,‘२०११ च्या विश्वचषक विजयांत मी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण, तरीही कर्करोगातून सावरत होतो तेव्हा धोनीने मला आवश्यक ती मदत केली नाही. क्रिकेटमुळे आम्ही एका संघात आलो. आणि आमच्यातील संबंध क्रिकेटपुरतेच राहिले. पण, त्याचा फटका मला संघातील स्थान टिकवताना बसला.’ युवराज आणि धोनी यांच्यातील वादात सतत इंधन घालण्याचं काम युवराजचे वडील योगराजही करत होते. युवराजला डावलून धोणीला भारतीय संघात संधी मिळाल्याचं योगराज वारंवार बोलून दाखवत असतात. (Dhoni – Harbhajan Dispute)

या दोघांनंतर आता हरभजन सिंगनेही आपलं धोणीशी पटत नसल्याचं उघड केलं आहे. २०१८ ते २०२० या कालावधीत दोघं एकत्र चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळले. पण, क्रिकेट सोडून आमचं काही बोलणं होत नव्हतं, असं हरभजनने म्हटलं आहे. संघातून वगळताना आपल्याशी संवाद ठेवला नसल्याची सल यापूर्वीही हरभजनने बोलून दाखवली होती. (Dhoni – Harbhajan Dispute)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.