ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या पुढील हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबरला दुबईत पार पडला. या लिलावासाठी (Dhoni & Pant Play Tennis) रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून तर महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार म्हणून सहभागी झाला होता. रिषभ पंतचा तर लिलावात सहभागी होण्याचा हा पहिलाच अनुभव होता.
त्यामुळे लिलावाचा तणाव संपल्यावर त्याने विरंगुळा म्हणून थेट हॉटेलमधील टेनिस कोर्ट गाठलं. इथं त्याला साथ दिली ती महेंद्रसिंग धोनीने. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओत रिषभ पंतने धोणीला एक जोरदार व्हॉली मारलेली दिसत आहे. त्यावर प्रेक्षकांचा आवाजही येतोय.
MS Dhoni and Rishabh Pant were playing tennis last night in Dubai after IPL auction. pic.twitter.com/LmLc2WFEGT
— ` (@WorshipDhoni) December 20, 2023
रिषभ पंत लिलावाच्या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे संचालक सौरभ गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्याबरोबर संघासाठी खेळाडूंची निवड आणि त्यासाठीची रणनीती आखताना दिसला. डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या रस्ते अपघातानंतर रिषभ क्रिकेटपासून दूर आहे. आणि आताही स्पर्धात्मक क्रिकेटकडे परतायला आणखी काही महिने लागतील हे तो स्वत:च कबूल करतो.
पण, आयपीएल त्याच्यासाठी चांगली सुरुवात असेल. रिषभ आता २६ वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्याकडे वेळ आहे ही जमेची बाजू आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने मेहनतही घेतली आहे. आणि आताही भारतीय संघातील त्याचा एकेकाळचा मार्गदर्शक धोनीबरोबर दुबईत तो वेळ घालवताना दिसला.
हेही पहा-