- ऋजुता लुकतुके
शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे क्रिकेट चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. हा धक्का सुख देणारा असला तरी असं कुणी आणि कसं घडवून आणलं असा प्रश्न चाहते विचारत आहेत. व्हायरल झालेला हा फोटो आहे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा. भारतीय क्रिकेटमधील हे तीन दिग्गज खेळाडू इथं एकाच टेबलवर आणि एकाच फोटो फ्रेममध्ये दिसत आहेत. (Dhoni, Sachin & Rohit)
हे कुणी घडवून आणलं असं चाहते सोशल मीडियावर विचारत आहेत. पण, हे एखादं जाहिरातीसाठीचं शूटिंग असावं असा अंदाज आहे. (Dhoni, Sachin & Rohit)
Sachin Tendulkar, MS Dhoni & Rohit Sharma together in Mumbai.
– The Reunion of Three Icons..!!!!🐐 pic.twitter.com/NuTj6T5yQ2
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 12, 2024
या तिघांपैकी धोनी आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे असे खेळाडू आहेत ज्यांनी या हंगामात कप्तानी सोडली आहे. महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी कप्तानी सोडत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडची (Rituraj Gaikwad) चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) कप्तानपदावर वर्णी लागली. पण, फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून धोणी चोख भूमिका बजावत आहे. तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) ऐवजी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) कप्तान म्हणून वर्णी लावण्याचा निर्णय मुंबई इंडियन्स संघ प्रशासनाचा होता. पण, रोहित फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करतोय. (Dhoni, Sachin & Rohit)
(हेही वाचा- Retail Inflation Rate : देशाचा किरकोळ महागाई दर १० महिन्यांतील निच्चांकावर )
तर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिकेटमधून निवृत्त झालाय. सध्या मुंबई इंडियन्स संघाचा तो मार्गदर्शक आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma)मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कप्तान नसला तरी राष्ट्रीय संघाचं नेतृत्व टी-२० विश्वचषकातही तोच करणार आहे. अलीकडेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा इतक्यात विचार नसल्याचं जाहीर केलं आहे. असे हे खेळाडू एका विशिष्ट कारणासाठी शुक्रवार एकत्र आले होते. (Dhoni, Sachin & Rohit)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community