- ऋजुता लुकतुके
आयपीएलमधील बंगळुरू फ्रँचाईजीने माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची फलंदाजीचा प्रशिक्षक आणि सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोमवारी सकाळी ट्विटरवर ही बातमी सगळ्यांना दिली आहे. कार्तिकचं अभिनंदन करताना फ्रँचाईजीने एक मोठा संदेशही लिहिला आहे. (Dinesh Karthik)
‘तुम्ही एखाद्या व्यक्तीला क्रिकेटमधून बाहेर काढू शकता. पण, त्याच्यातील क्रिकेट बाहेर काढू शकत नाही. दिनेश कार्तिक आमचा यष्टीरक्षक होता आणि खऱ्या अर्थाने संघाचा रक्षणकर्ता होता. आता नवीन अवतारात तो आपल्या सगळ्यांबरोबर जोडला जाणार आहे. त्याचं स्वागत करूया. त्याला प्रेम देऊया. तो संघाचा बारावा खेळाडू असणार आहे. फलंदाजीचा प्रशिक्षक आणि सल्लागार म्हणून,’ असं बंगळुरू संघाने ट्विटरवरील संदेशात लिहिलं आहे. (Dinesh Karthik)
Our new 𝗕𝗮𝘁𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 𝗮𝗻𝗱 𝗠𝗲𝗻𝘁𝗼𝗿 𝘋𝘪𝘯𝘦𝘴𝘩 𝘒𝘢𝘳𝘵𝘩𝘪𝘬 loves RCB as much as our 12th Man Army loves him! ❤️
He has a special message and an even more special promise for fans ahead of his new innings with us! 🎥#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/1E27Qwbatt
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) July 1, 2024
(हेही वाचा – Ind Win T20 World Cup : ‘विश्वचषक हातातून निसटताना मी पाहिला, तोच मी सीमारेषेवर पकडला,’ – सूर्यकुमार यादव)
यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळल्यानंतर दिनेश कार्तिकने आयपीएलमधून ३९ व्या वर्षी निवृत्ती पत्करली होती. या हंगामात त्याने ३२६ धावा करताना दोन अर्धशतकं ठोकली. त्याचा स्ट्राईकरेट १८७ इतका तगडा होता. इलिमिनेटर मुकाबल्यात सनरायझर्स हैद्राबादकडून पराभव झाल्यावर कार्तिकने १ जून रोजी आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. (Dinesh Karthik)
दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये ६ संघांसाठी खेळला आहे आणि २५६ सामन्यांत त्याने ४,८१६ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २२ अर्धशतचं जमा आहेत. तळाला येऊन त्याचा स्ट्राईकरेट (१३५) हा स्पर्धेत तळाच्या फलंदाजांमध्ये सर्वोत्तम मानला जातो. तर यष्टीरक्षक म्हणून तो स्पर्धेतील दुसरा यशस्वी यष्टीरक्षक आहे. त्याच्या नावावर १७८ झेल आणि ३६ यष्टीचीत बळी आहेत. फक्त महेंद्र सिंह धोनी त्याच्या पुढे आहे. (Dinesh Karthik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community