Dinesh Karthik : दिनेश कार्तिक निवृत्तीनंतर खेळणार लीजेंड्स कप लीग

97
Dinesh Karthik : दिनेश कार्तिक निवृत्तीनंतर खेळणार लीजेंड्स कप लीग
Dinesh Karthik : दिनेश कार्तिक निवृत्तीनंतर खेळणार लीजेंड्स कप लीग
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही (Dinesh Karthik) शिखर धवन पाठोपाठ लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. यावर्षी जून महिन्यात दिनेश कार्तिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. तर काही महिन्यांपूर्वी बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सकडून तो आपली शेवटची आयपीएलही खेळला. दिनेश कार्तिकने यंदाच्या आयपीएलमध्ये मधल्या फळीत येऊन घणाघाती फलंदाजी करण्याचा लौकिक कायम केला आहे. २०२४ च्या आयपीएल लीगमध्ये शेवटच्या काही सामन्यात त्याने १८३ च्या स्ट्राईकरेटने फलंदाजी केली आहे. शिवाय त्याचं यष्टीरक्षणही भक्कम आहे.

(हेही वाचा- BMC : दुय्यम अभियंत्यांना सहायक अभियंता पदी बढती, वशिलेबाजांनी आणला प्रशासनाच्या नाकात दम)

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर मला लीजेंड्स लीगमध्ये खेळण्याची इच्छा नक्कीच आहे. मला क्रिकेट खेळत राहण्यात रस आहे. आणि ते या लीगच्या निमित्ताने मी करू शकतो. लिजंड्स लीग क्रिकेटच्या आव्हानासाठी मी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार आहे असं मला वाटतं. चाहत्यांनी आतापर्यंत मला दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे,’ असं दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आएनएस वृत्त संस्थेशी बोलताना सांगितलं आहे.

३९ वर्षीय दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) भारतासाठी सर्व प्रकारात मिळून १८० सामने खेळला आहे. आणि यात त्याने ३,४६३ धावा जमवल्या आहेत. त्याच्या नावावर १७ अर्धशतकं आहेत. तर यष्टीरक्षक म्हणून त्याने १७२ बळी मिळवले आहेत. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) भारतीय संघात असल्यामुळे या काळात दिनेश कार्तिकला खूपच कमी संधी मिळाल्या.

(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहली पत्नी अनुष्कासह दिसला लंडनच्या रस्त्यावर, व्हिडिओ व्हायरल )

आयपीएलमध्ये मात्र मागचे १७ हंगाम दिनेश कार्यरत आहे. ६ वेगवेगळ्या फ्रँचाईजी संघांकडून खेळताना त्याने २५७ सामन्यांमध्ये तळाला फलंदाजी करत ४,८७२ धावा जमवल्या आहेत. यात २२ अर्धशतकांचा समावेश आहे. आणि आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बरोबरीने तो दुसऱ्या स्थानावर आहे. लिजंड्स लीग क्रिकेटच्या नवीन हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव येत्या २९ ऑगस्टला नवी दिल्ली इथं होणार आहे. (Dinesh Karthik)

हेही पाहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.