-
ऋजुता लुकतुके
ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला जिमनॅस्ट असलेल्या दीपा कर्माकरने (Dipa Karmakar) सोमवारी अचानक आपली निवृत्ती जाहीर केली. ३१ व्या वर्षीच दीपाने आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक्सला राम राम केलं आहे. आपल्या मनातील भावना तिने ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. ‘बऱ्याच विचाराअंती मी जिमनॅस्टिक्समधून निवृत्त होण्याचं ठरवलं आहे. हा निर्णय अर्थातच सोपा नव्हता. पण, ही वेळ योग्य आहे. जिमनॅस्टिक्स माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे. आणि या खेळाने मला दिलेले सगळे अनुभव – चांगले, वाईट या सगळ्याचा मला अभिमान आहे,’ असं दीपा कर्माकरने (Dipa Karmakar) आपल्या संदेशात लिहिलं आहे.
Signing off from the mat! ❤️
Thank you to everyone who has been a part of my journey.
Onto the next chapter🤸🏻♀️🙏🏻 pic.twitter.com/kW5KQZLr29— Dipa Karmakar (@DipaKarmakar) October 7, 2024
(हेही वाचा – BYD eMAX 7 : बीवायडी इमॅक्स ७ ही पूर्णपणे इलेक्ट्रिक गाडी भारतात लाँच)
दीपा लहान असताना तिच्या पायाचा तळवा सपाट असल्यामुळे ती कुठलाही खेळ आणि त्यातही जिमनॅस्टिक्स खेळू शकणार नाही, असं तिला सांगण्यात आलं होतं. त्याची आठवणही तिला निवृत्तीच्या वेळी आली. पण, या सगळ्या समस्यांचा यशस्वीपणे मुकाबला करत दीपा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. ‘माझ्या कामगिरीकडे मागे वळून पाहिलं तर मला अभिमानच वाटतो. देशाचं प्रतिनिधित्व मी करू शकले. आणि रिओमध्ये प्रुदोनोवा प्रकारात मी सहभागी झाले हा सर्वोच्च बिंदू मला वाटतो. ती घटना माझ्यासाठी अविस्मरणीय होती,’ असं दीपाने (Dipa Karmakar) म्हटलं आहे.
Dipa Karmakar is one of only five women worldwide who has mastered the Produnova vault. 🤸♀️@WeAreTeamIndia | @DipaKarmakar pic.twitter.com/ZtmI63SCpx
— Olympic Khel (@OlympicKhel) September 15, 2024
(हेही वाचा – Jammu And Kashmir Election Results 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर ; जाणून घ्या )
२०२२ च्या आशियाई जिमनॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत मिळवलेलं पदक हे तिचं शेवटचं यश होतं. त्यानंतर दुखापतींनीही तिचा पिच्छा पुरवला. आणि तेव्हापासून अनेकदा तिने स्पर्धा खेळण्याची आपली असमर्थता बोलून दाखवली होती. आताही शरीरीने संकेत दिल्यामुळे थांबणं हाच मार्ग असल्याचं दीपाने म्हटलं आहे. पुढे काय करणार हे तिने अजून ठरवलेलं नाही. दीपाने प्रुदोनोव्हा वॉल्ट हा प्रकार निवडला. जिमनॅस्टिक्समध्ये हा सगळ्यात कठीण प्रकार मानला जातो. जगभरात फक्त ५ जिमनॅस्टनी यात नैपुण्य मिळवलं आहे. आणि त्यातील एक एक दीपा कर्माकर (Dipa Karmakar) आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community