Djokovic Stunned : युनायटेड चषक स्पर्धेत जोकोविचला पराभवाचा धक्का

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची तयारी म्हणून युनायटेड चषकाकडे बघितलं जातं. 

193
Djokovic Stunned : युनायटेड चषक स्पर्धेत जोकोविचला पराभवाचा धक्का
Djokovic Stunned : युनायटेड चषक स्पर्धेत जोकोविचला पराभवाचा धक्का
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची तयारी म्हणून युनायटेड चषकाकडे बघितलं जातं. (Djokovic Stunned)

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन इथं हंगामातील पहिली व्यावसायिक टेनिस स्पर्धा युनायटेड चषक सुरू आहे. आणि इथं जोकोविचला पराभवाचा धक्का बसला आहे. उपउपांत्य फेरीत जोकोविचला ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स डी मिनॉर कडून ४-६ आणि ४-६ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या सांघिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सर्बियावर १-० अशी आघाडी घेतली आहे. (Djokovic Stunned)

आधीच्या फेरीत सर्बियाने झेक रिपब्लिकचा पराभव केला तेव्हा खेळताना जोकेविचचं मनगट दुखावलं होतं. त्या सामन्यानंतर जोकोविचने तात्पुरते उपचार घेतले. पण, परत डी मिनॉर विरुद्ध खेळताना त्याला त्रास जाणवत होता. पहिल्या सेटमध्ये ४४ अशा बरोबरीनंतर जोकोविचने सलग गुण गमावत डिमिनॉरला आगेकूच करण्याची संधी दिली. (Djokovic Stunned)

(हेही वाचा – Vivo X100 Series : जाणून घ्या विवो एक्स १०० सीरिजचे काय आहेत फिचर्स?)

४३ सामन्यांची विजयी मालिका या पराभवामुळे संपुष्टात

दुसऱ्या सेटमध्येही जोकोविच ३-४ असा लवकरच मागे पडला. त्यानंतर मात्र त्याने ४ मॅच पॉइंट वाचवले. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शेवटी ॲलेक्स डी मिनॉरने हा सामना जिंकलाच. जोकोविचची ऑस्ट्रेलियातील सलग ४३ सामन्यांची विजयी मालिका या पराभवामुळे संपुष्टात आली. (Djokovic Stunned)

यापूर्वी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत जोकोविच चुंग हिऑनकडून हरला होता. तेव्हाही त्याला कोपराच्या दुखापतीने सतावलं होतं. पण, त्यानंतर जोकोविचने पुन्हा ऑस्ट्रेलियात एकही सामना गमावला नव्हता. दुसरीकडे अव्वल खेळाडू जोकोविचला नमवल्यामुळे डी मिनॉर खुश आहे. क्रमवारीत सध्या १२ व्या स्थानावर असलेल्या डी मिनॉरने पहिल्यांदाच नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) हरवण्याची किमया केली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाला त्याने उपांत्य फेरीतही पोहोचवलं आहे. (Djokovic Stunned)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.