- ऋजुता लुकतुके
सौदी अरेबियामध्ये सध्या व्यावसायिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आखूड पोषाखासाठी प्रसिद्ध असलेल्या टेनिसबद्दल या इस्लामिक देशात मतमतांतरं आहेत. त्यातच पुरुषांची किंग्ज-स्लॅम स्पर्धा इथं भरवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या स्पर्धेत दिग्गज खेळाडू राफेल नदाल (Rafael Nadal) आणि नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यांच्या बरोबरीने विम्बल्डन विजेता कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिनरही सहभागी होणार आहेत. (Djokovic vs Nadal)
स्पर्धेतील इतर दोन खेळाडू असतील ते डॅनिएल मेदवेदेव आणि होल्गर रुन. सौदी अरेबियातील व्यावसायिकांनी अलीकडे आंतरराष्ट्रीय व्यावसायिक टेनिसमध्ये भरपूर पैसा ओतला आहे. आणि अनेक स्पर्धाही ते पुरस्कृत तसंच आयोजित करत आहेत. महिलांची वर्षातील शेवटची डब्ल्यूटीए स्पर्धाही इथंच आयोजित करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे. पण, याला मार्टिना नवरातिलोवा आणि ख्रिस एव्हर्ट या माजी चॅम्पियन खेळाडूंनी विरोध केला आहे. (Djokovic vs Nadal)
Djokovic, Nadal to headline ‘Six Kings Slam’ in Saudi Arabia https://t.co/BUjWrc0PPp pic.twitter.com/dthF78cK4G
— Reuters (@Reuters) February 6, 2024
(हेही वाचा – Narendra Modi: कॉंग्रेसने आपल्या केवळ ४० जागा वाचवून दाखवाव्यात, पंतप्रधान मोदींचं राज्यसभेतून थेट आव्हान)
अजूनही मुलांना हे खेळ खेळण्याची परवानगी नाही
‘महिला टेनिसला आम्ही वर आणलं ते सौदी अरेबियाने त्याची पुन्हा वाट लावावी यासाठी नाही,’ अशी तिखट प्रतिक्रिया दोघींनी वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्राला दिली होती. त्यांचा आक्षेप अर्थातच सौदी अरेबियातील महिलाविरोधी कायद्यांना आहे. महिलांनी पूर्ण कपडे परिधान करण्याच्या अटीमुळे तिथे महिलांना टेनिस खेळूही दिलं जात नाही. अशावेळी टेनिसमध्ये या देशातून आलेले पैसेही न स्वीकारण्याची नवरातिलोवा आणि एव्हर्ट यांची भूमिका आहे. तर काही मुस्लीम खेळाडूंनी, सौदी अरेबिया देश आता बदलत आहे. आणि तिथेही कायदे बदलतायत, हे जगाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (Djokovic vs Nadal)
राफेल नदालही सौदी अरेबियन टेनिसशी जोडला गेलेला आहे. तो सौदी टेनिसचा सध्याचा ब्रँड अँबेसिडर आहे. सौदी अरेबियाने अलीकडे खेळांवर बराच पैसा खर्च केला असून २०३४ चा फिफा विश्वचषक तिथे होणार आहे. तसंच अनेक युरेपीयन फुटबॉल स्टारना त्यांनी देशी क्लबसाठी करारबद्ध केलं आहे. अलीकडेच फॉर्म्युला वन ग्रांप्रि देशात भरवली आहे. आणि कुस्ती तसंच मुष्टीयुद्धाच्या जागतिक लीगही इथं भरवण्यात आल्या होत्या. पण, हे सगळं असताना मुलांना हे खेळ खेळण्याची अजूनही परवानगी नाही. (Djokovic vs Nadal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community