ऑलिम्पिक खेळांसाठी मोठे योगदान देणारे माजी हॉकीपटू Viren Rasquinha यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

63
ऑलिम्पिक खेळांसाठी मोठे योगदान देणारे माजी हॉकीपटू Viren Rasquinha यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?
ऑलिम्पिक खेळांसाठी मोठे योगदान देणारे माजी हॉकीपटू Viren Rasquinha यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

Viren Rasquinha हे भारतीय माजी हॉकी खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचे कर्णधार होते. वीरेन रास्किन्हा यांचा जन्म १३ सप्टेंबर १९८० रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांनी मुंबईतील वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर वांद्रे येथील एमएमके कॉलेजमधून बी.कॉम. ची पदवी घेतली.

त्यांचे वडील एरिक हे अभियंता होते आणि त्यांची आई मेर्लिन ह्या मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर होत्या. मात्र त्यांनी क्रिडा हा पर्याय निवडला. त्यांनी १९९९ मध्ये ज्युनियर आंतरराष्ट्रीय हॉकी टीममध्ये पदार्पण केले आणि ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे २००१ ज्युनियर विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे ते खेळाडू होते. (Viren Rasquinha)

(हेही वाचा- Chemical Gas Leakage : अंबरनाथ एमआयडीसीत रायासायनिक कंपनीतून गॅस गळती; प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न)

त्यांनी २००२ मध्ये ॲडलेडमधील फोर नेशन टूर्नामेंटमध्ये मिडफिल्डर म्हणून वरिष्ठ आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले. २००२ च्या बुसान येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक, क्वालालंपूर येथील आशिया चषक आणि २००३ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. (Viren Rasquinha)

२००४ अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या संघाचे ते सदस्य होते. २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्यांनी पहिल्यांदा भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केले. ते १८० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र वयाच्या २८ व्या वर्षी व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीला सोडचिठ्ठी दिली. (Viren Rasquinha)

(हेही वाचा- भारतात Green Hydrogen निर्माण करण्यासाठी थरमॅक्सची सेरेसशी भागीदारी)

एमबीए पूर्ण केल्यानंतर, ते २००९ मध्ये ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टमध्ये सामील झाले आणि आता ते सीईओ आहेत. त्याचबरोबर ते २०१६ रिओ ऑलिम्पिकचे PMO टास्क फोर्सचे सदस्य होते. या टास्क फोर्सने २०२०, २०२४ आणि २०२८ मध्ये ऑलिम्पिक खेळांसाठी भारताच्या योजना तयार केल्या होत्या. (Viren Rasquinha)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.