Doping Suspension : हातोडाफेकपटू रचना कुमारीचं तब्बल १२ वर्षांसाठी निलंबन

एका वर्षांत अनेकदा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

232
Doping Suspension : हातोडाफेकपटू रचना कुमारीचं तब्बल १२ वर्षांसाठी निलंबन
  • ऋजुता लुकतुके

भारताची अव्वल हातोडाफेकपटू रचना कुमारीवर आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स फेडरेशनच्या ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने १२ वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे तिची कारकीर्द संपल्यात जमा आहे. ३० वर्षीय रचनाच्या लघवीच्या नमुन्यात स्टॅनोझोलोल, मेटॅडिनोन अशी एकापेक्षा जास्त उत्तेजक द्रव्य आढळली होती. अचानक होणाऱ्या उत्तेजक चाचणी दरम्यान गेल्यावर्षी स्पर्धेच्या बाहेर ती आपल्या गावी असताना केलेली ही उत्तेजक चाचणी होती. २४ सप्टेंबर २०२३ नंतर तिने सहभाग घेतलेल्या स्पर्धेतील निकालही आता तिच्यासाठी रद्द करण्यात आले आहेत. (Doping Suspension)

विशेष म्हणजे फेब्रुवारी २०१५ मध्ये ती पहिल्यांदा उत्तेजक चाचणीत दोषी आढळली होती. आणि त्यानंतर रचनावर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मार्च २०१९ पर्यंत ती निलंबितच होती. आता पुन्हा दोषी आढळल्यामुळे सराईत गुन्हेगार मानून तिची बंदीची मुदत वाढवण्यात आली आहे. दुसऱ्या गुन्ह्यासाठी खरंतर ८ वर्षांची शिक्षा आहे. पण, रचना कुमारीने आपल्या विषयीची काही माहितीही लपवली होती. तसंच एकावेळी अनेक उत्तेजक द्रव्य आढळल्यामुळे तिच्यावर कडक कारवाई करण्यात आली. (Doping Suspension)

(हेही वाचा – BJP चे १७-१८ फेब्रुवारीला राष्ट्रीय अधिवेशन)

रचना कुमारी भारताकडून होआंगझाओ इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळली आहे. तर ५८.१३ मीटरची हातोडाफेक करत ती महिला गटात नववी आली होती. अलीकडेच भुबनेश्वरमध्ये झालेल्या आंतर-राज्य स्पर्धेत तिने सुवर्ण जिंकलं होतं. तर गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं होतं. हे सगळे निकाल अर्थातच आता रद्द होतील. (Doping Suspension)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.