‘ड्रीम इलेव्हन’ ऑनलाइन गेमिंग कंपनीला (Dream 11 Company) आयकर विभागाने २५ हजार कोटी रुपयांच्या करवसुलीची नोटीस बजावली आहे. ‘ड्रीम इलेव्हन’कंपनीने ४० हजार कोटी रुपयांचा जीएसटी चुकविल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनीने अद्याप या नोटीसला उत्तर दिले नसून आतापर्यंत जीएसटी चुकविल्याची ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे सांगितले जात आहे.
हर्ष जैन आणि भावीत सेठ या दोघांनी २००८ मध्ये एकत्र येऊन ड्रीम इलेव्हन ही ऑनलाईन गेमिंम कंपनी (Dream 11 Company) सुरु केली. सुमारे १० कोटी पेक्षा जास्त लोक त्याचे युजर्स आहेत. क्रिकेट पासून कबड्डी पर्यंत अनेक खेळांचा त्यामध्ये समावेश आहे. ही कंपनी त्यांच्या युजर्सना वेगवेगळ्या खेळांमध्ये बेटिंग करून कॅश प्राईज जिंकण्याची संधी देते.
(हेही वाचा – Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव नामांतराचा वाद पुन्हा एकदा न्यायालयात गाजणार)
मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीच्या (Dream 11 Company) व्यवहारांमध्ये २०१७ पासून काही अनियमितता आढळली आणि त्याची चौकशी केल्यानंतर तब्बल ४० हजार कोटी रुपयांचा जीएसटी कंपनीने भरला नसल्याचे लक्षात आले. ‘ड्रीम इलेव्हन’ कंपनीच्या एकूण टर्नओव्हर आणि फायद्यातून २८ टक्के जीएसटी देणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष कंपनीने तो भरला नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कंपनीला नोटीस बजावली आहे.
यासोबतच कॅसिनो आणि हॉटेल्सची मालकी आणि संचालन करणारी भारतीय गेमिंग (Dream 11 Company) आणि हॉस्पिटॅलिटी कंपनी असणाऱ्या डेल्टो कॉर्पला १६ हजार ८२२ कोटी रुपयांची कर नोटीस जारी करण्यात आली आहे. यापूर्वी गेम क्राफ्टकडून २१ हजार कोटी रुपयांची जीएसटीची मागणी करण्यात आली होती, ज्यासाठी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सप्टेंबरच्या अखेरीस अंतिम सुनावणी होऊ शकते. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीजीजीआय ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून सुमारे १ लाख कोटी रुपयांचा कर गोळा करू शकतो. या प्रकरणी ड्रीम इलेव्हन (Dream 11 Company) आणि हेड डिजिटल वर्क्स यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community