- ऋजुता लुकतुके
देशातील पासपोर्ट आणि व्हिसा समस्यांमुळे युएई दौऱ्यावरील पाक संघ (Pak Team) तर व्यवस्थापकांशिवायच खेळतोय. (Pak Team Without Doctor)
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मैदानाबाहेरही अनेक समस्या आहेत. पाकचा राष्ट्रीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाचा दौरा करत आहे. पण, संघाबरोबर फीजिओ किंवा डॉक्टरच नसल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर १९ वर्षांखालील संघ जो सध्या युएईमध्ये आहे तो व्यवस्थापकांशिवायच खेळतो आहे. ही सगळी समस्या पासपोर्ट आणि व्हिसा प्रक्रियेमुळे उद्भवल्याचं समजतंय. (Pak Team Without Doctor)
(हेही वाचा – Deepak Chahar : दीपक चहर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकणार?)
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संयुक्त दौऱ्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने सोहेल सलीम यांची नियुक्ती केली होती. पण, त्यांचा व्हिसा वेळेवर मिळाला नाही. (Pak Team Without Doctor)
‘पाक बोर्ड सलीम यांच्यासाठी व्हिसा मिळवण्याच्या खटपटीत आहे आणि तो मिळाला के ते संघाबरोबर ऑस्ट्रेलियात पोहोचतील,’ असं पाक बोर्डाच्या एका पदाधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. त्याचप्रमाणे १९ वर्षांखालील संघाच्या युएई दौऱ्यात माजी कसोटीपटू शोएब मोहम्मद यांची व्यवस्थापक म्हणून निवड झाली होती. पण, शोएब यांचा पासपोर्ट संपला होता. तो नवीन तयार झाल्यावर ते तातडीने युएईला रवाना होतील, असं बोललं जात आहे. (Pak Team Without Doctor)
(हेही वाचा – Namaz Break In Rajya Sabha : नमाजसाठी मिळणारा राज्यसभेतील अर्धा तासाचा ब्रेक रद्द)
याशिवाय ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या पाक संघातही एक बदल करण्यात आला आहे. अबरार अहमदच्या जागी साजिद खान या ऑफ-स्पिनरची निवड पाक संघात (Pak Team) करण्यात आली आहे. पण, साजिदलाही वेळेवर व्हिसा मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियात पोहोचू शकलेला नाही. (Pak Team Without Doctor)
खेळाडू किंवा व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यापूर्वी बोर्डाने त्यांच्याकडे पासपोर्ट आहे की नाही आणि व्हिसा प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल ना, याची काळजी का घेतली नाही, असा प्रश्न आता पाक मीडियाकडून उपस्थित केला जातोय. (Pak Team Without Doctor)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community