श्रीलंकेतील आणीबाणीमुळे आशिया कपही धोक्यात

आशियाई कप क्रिकेट स्पर्धेच्या 15 व्या हंगामाचे यजमानपद श्रीलंकेला मिळाले आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत रंगणा-या स्पर्धा श्रीलंकेत होणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सध्या श्रीलंका आर्थिक मंदीचा सामना करत आहे. देशातील या परिस्थितीमुळे त्यांना आशियाई स्पर्धेचे यजमानपद गमावण्याची भीती निर्माण झाली आहे. गरजेच्या वस्तू आयात करण्यासाठीही श्रीलंकेकडे पैसे नाहीत. यामुळे आता श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला फटका बसणार आहे.

बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

श्रीलंकेची परिस्थिती इतकी वाईट आहे की सध्या भारतात सुरु असलेल्या इंडियमन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील सामन्याचे प्रसारणही बंद करण्याची वेळ आली आहे. आशियाई कप जो श्रीलंकेत होणार आहे तो दुस-या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येऊ शकतो. पण यासंदर्भात अद्याप आयसीसीने कोणतीही भूमिका मांडलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची तिमाही बैठक दुबईमध्ये होणार आहे. या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावाची रंजक कहाणी )

6 संघ सहभागी

यंदाच्या आशियाई कप स्पर्धेमध्ये 6 संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंकेशिवाय या गत विजेता भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणीस्तान या स्पर्धेत खेळताना दिसतील. 6 वा संघ पात्रता फेरीतून निवडला जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here