- ऋजुता लुकतुके
दुलिप करंडकाच्या पहिल्या फेरीचे सामने सध्या सुरू आहेत. यात एरवी गोलंदाजांचं वर्चस्व असलं तरी एका मुंबईकर फलंदाजाने सगळ्याचं आणि खास करून निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं नाव आहे मुशीर खान. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत मुशीरचा मोठा भाऊ सर्फराज खानने भारतीय संघात स्थान मिळवलं होतं. आता दोघंही दुलिप करंडक स्पर्धेत भारतीय ब संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. मुंबई क्रिकेटचं भूषण असलेला फलंदाजीतील खडूसपणा दोघांमध्ये भिनलेला आहे. त्याचवेळी मोठा फटका खेळायला ते कचरत नाहीत.
(हेही वाचा – Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवातील पावित्र्य आणि धर्मजागृतीसाठी शंभराहून अधिक गणेश मंडळ आली एकत्र)
Magnificent Musheer 🔥
Re-live his magical knock of 181(373) 📽🔽️https://t.co/Ug8CGHHrf0
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 6, 2024
मुशीरचे वडील नौशाद खान मुंबईच्या आझाद मैदानावर क्रिकेटचा प्रशिक्षण वर्ग चालवतात. दोघंही तिथेच तयार झाले आहेत. कांगा लीगमध्ये सर्फराझ खानचा विक्रम मोडून ८ व्या वर्षी मुशीरने स्थान मिळवलं तेव्हा तो पहिल्यांदा बातम्यांमध्ये आला होता. पण, खरं नाव त्याने कमावलं ते या वयात डावखुरी उपयुक्त फलंदाजी आणि डावखुऱ्या फिरकीने २५ बळी मिळवत.
२०२२ मध्ये मुशीर मुंबईच्या १८ वर्षांखालील संघात खेळायला लागला. कूचबिहार करंडक स्पर्धेत त्याची पहिली झलक बघायला मिळाली. पहिल्याच हंगामात ६३२ धावा आणि ३२ बळी मिळवून तो थेट मुंबईच्या रणजी संघात धडकला. तिथून त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एकेक पायऱ्या सर केल्या आहेत. पहिल्या कूचबिहार करंडक स्पर्धेत तो मालिकावीर ठरला होता. पण, पहिल्या रणजी हंगामात तो काहीसा फ्लॉप झाला. पण, ती कसर त्याने सी के नायडू स्पर्धेत भरून काढली. हैद्राबाद विरुद्ध ३६७ चेंडूंत ३३९ धावा करत त्याने आपली चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली.
(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : मुंबई पोलिसांना गणेशोत्सव काळात सतर्क राहण्याचे आदेश)
HUNDRED FOR MUSHEER KHAN ON HIS DEBUT. 🥶
– An emotional celebration by his brother, Sarfaraz Khan…!!!! pic.twitter.com/dQMRnU5X2g
— Johns. (@CricCrazyJohns) September 5, 2024
तिथून भारताच्या १९ वर्षांखालील संघात त्याला स्थान मिळालं. दक्षिण आफ्रिका तसंच आशिया चषकात खेळण्याची संधीही त्याला मिळाली. या मोहिमा फत्ते केल्यावर गेल्याच वर्षी रणजी स्पर्धेत बडोद्याच्या बलाढ्य संघाविरुद्ध द्विशतक ठोकून त्याने पहिल्यांदा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले. तर अंतिम फेरीत विदर्भाविरुद्धही त्याने शतक झळकावलं. आणि आता दुलिप करंडकात ठोठावलेल्या शतकामुळे तो निवड समितीच्या नजरेसमोर नक्कीच आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community