Duleep Trophy 2024 : सर्फराझ खान भारतीय संघात निवड होऊनही दुलिप करंडक का खेळतोय?

Duleep Trophy 2024 : सर्फराझ वगळता इतर खेळाडू भारतीय राष्ट्रीय शिबिरात दाखल झाले आहेत 

136
Duleep Trophy 2024 : सर्फराझ खान भारतीय संघात निवड होऊनही दुलिप करंडक का खेळतोय?
Duleep Trophy 2024 : सर्फराझ खान भारतीय संघात निवड होऊनही दुलिप करंडक का खेळतोय?
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयने अलीकडेच दुलिप करंडकाच्या (Duleep Trophy 2024) दुसऱ्या फेरीसाठीचे नवीन संघ जाहीर केले. कारण, भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी राष्ट्रीय संघात निवड झालेले खेळाडू शिबिरात दाखल झाले आहेत. फक्त सर्फराझ खान आणि यश दयाल हे दोन खेळाडूच दुलिप करंडकाची दुसरी फेरी खेळणार आहेत. असं नेमकं का आहे? सर्फराझला भारतीय संघात अंतिम अकरांमध्ये स्थान मिळणार नाही का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. कारण, के एल राहुल, कुलदीप सिंग, रिषभ पंत, शुभमन गिल, अक्षर पटेल, आकाशदीप, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयसवाल असे खेळाडू शिबिरासाठी दुलिप करंडकातून बाहेर पडले आहेत.

(हेही वाचा- Ganeshotsav 2024 : मुंबईतील प्रदीप्त मोदकाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद)

यश दयाल आणि सर्फराझ खान मात्र दुलिप करंडकाच्या अनुक्रमे क व ब संघांकडून खेळणार आहेत. पण, याचा अर्थ असा की, बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्यांचा विचार कदाचित होणार नाही. दुलिप करंडकाची दुसरी फेरी १२ तारखेपासून सुरू होणार आहे. तर भारतीय शिबीरही तेव्हाच चेन्नईत सुरू होतंय. भारत विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी १९ तारखेपासून चेन्नईत रंगणार आहे.  (Duleep Trophy 2024)

भारतीय संघात मधल्या फळीतील एका जागेसाठी के एल राहुल आणि सर्फराझ खान यांच्यात थेट स्पर्धा होती. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे अंतिम अकरामध्ये राहुलची निवड जवळ जवळ निश्चित झालीय. महत्त्वाचे खेळाडू राष्ट्रीय सेवेसाठी गेल्यामुळे दुलिप करंडकातील १२ खेळाडू बदलले आहेत. त्यामुळे बदललेले दुलिप करंडकाचे संघ पुढील प्रमाणे,  (Duleep Trophy 2024)

(हेही वाचा- IAF Wing Commander वर बलात्काराचा आरोप; महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद)

भारतीय (अ) – मयंक अगरवाल (कर्णधार), रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिध कृष्णा, खलिल अहमद, आवेश खान, कुमार कुशाग्र, शाश्वत रावत, प्रथम सिंग, अक्षय वाडकर, एक के रशीद, शम्स मुलानी व अकिब खान

भारतीय (ब) – अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), सर्फराझ खान, मुशीर खान, नितिश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मुकेश कुमार, राहुल चाहर, साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदिशन, सुयश प्रभूदेसाई, रिंकू सिंग व हिमांशू मंत्री

(हेही वाचा- Hindus In Bangladesh : ‘अजानच्या पाच मिनिटे आधी पूजा आणि स्पीकर बंद करा; बांगलादेशच्या गृहमंत्रालयाचा फतवा)

भारतीय क संघात कुठलाही बदल नाही 

भारतीय (क) – श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्थव तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भूई, सारांश जैन, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, आकाश सेनगुप्ता, के एस भरत, सौरभ कुमार, संजू सॅमसन, निशांत संधू व विध्वथ कावेरप्पा

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.