-
ऋजुता लुकतुके
बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. यश दयालचा अपवाद सोडला तर यात एकही नवीन खेळाडू नाही. संघाची निवड जाहीर होत असताना दुलिप करंडक (Duleep Trophy 2024) ही देशातील महत्त्वाची देशांतर्गत स्पर्धाही सुरू आहे. या स्पर्धेत चमकलेला आकाश दीप भारतीय संघात आहे. पण, याशिवाय आणखीही काही युवा खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या कामगिरीने निवड समितीला नक्कीच दखल घ्यायला लावली आहे. आणि आज ना उद्या त्यांचं नाव भारतीय जर्सीवरही दिसू शकतं. असे तीन नवोदीत खेळाडू आणि त्यांची कामगिरी पाहूया.
मुशीर खान
मुशीर खान (Musheer Khan) दुलीप करंडक (Duleep Trophy 2024) स्पर्धेत भारत ब संघाकडून खेळत आहे. भारत अ विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात मुशीरने पहिल्या डावात फलंदाजी करताना १६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १८१ धावा केल्या. मुशीरच्या (Musheer Khan) या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुशीरची ही खेळी त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरू शकते. मुशीरचा मोठा भाऊ सर्फराझ खान सध्या भारतीय संघाकडून खेळत आहे. आणि बांगलादेश विरुद्ध त्याचा संघात समावेश झाला आहे.
(हेही वाचा – Surat च्या गणेशोत्सव मंडपावर मुसलमानांकडून दगडफेक; 33 जणांना अटक)
मानव सुथार
मानव सुथार (Manav Suthar) दुलीप करंडकात (Duleep Trophy 2024) भारत क संघाकडून खेळत आहे. भारत डी विरुद्धच्या सामन्यात सुथारने अप्रतिम कामगिरी केली. सुथारने पहिल्या डावात फक्त एक बळी घेऊ शकलेल्या सुधारने दुसऱ्या डावांत चक्क ७ बळी मिळवले. सामन्यात ८ बळी टिपणाऱ्या सुधारलाच सामनावीराचा किताब मिळाला. आपल्या कामगिरीने त्याने निवड समितीचं लक्ष नक्कीच आपल्याकडे वेधलं आहे.
नितीश कुमार रेड्डी
नितिश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) आयपीएलमधील कामगिरीमुळे चर्चेत होताच. त्यानंतर रणजी करंडकातही गेल्या हंगामात त्याने चमकदार कामगिरी केली आहे. आता दुलिप करंडक स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत त्याने निवड समितीचं लक्ष वेधलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community