Duleep Trophy : शुभमन गिल, रिषभ पंत यांचा दुलिप करंडकासाठी सराव

आगामी कसोटी मालिकांसाठी भारतीय खेळाडू सज्ज होत आहेत.

122
Duleep Trophy : शुभमन गिल, रिषभ पंत यांचा दुलिप करंडकासाठी सराव
Duleep Trophy : शुभमन गिल, रिषभ पंत यांचा दुलिप करंडकासाठी सराव
  • ऋजुता लुकतुके

५ सप्टेंबरपासून दुलिप करंडकाचे (Duleep Trophy) सामने सुरू होत आहेत. आणि भारताचे अ, ब, क आणि ड असे चार देशांतर्गत संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. भारतीय राष्ट्रीय संघाचा मार्ग दुलिप करंडकातून (Duleep Trophy) जातो असं नेहमी म्हटलं जातं. आणि आता तर हंगामात बांगलादेशबरोबरची मालिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा समोर आहे. त्यामुळे दुलिप करंडकाला (Duleep Trophy) दुहेरी महत्त्व आलं आहे. संघात ज्यांचं स्थान पक्कं आहे, अशा खेळाडूंना कसोटी स्पर्धात्मक सरावाची ही शेवटची संधी आहे. तर ज्यांना भारतीय संघात स्थान मिळवायचंय त्यांच्यासाठी तर ही मोलाची संधी आहे.

भारतीय अ संघाचा कर्णधार शुभमन गिलही (Shubman Gill) आगामी कसोटी हंगामासाठी तयारी करत आहे. आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर गिलने स्वत: आपल्या सरावाचा व्हीडिओ शेअर केला आहे. ‘सगळ्यात परिणामकारक उपाय हा आहे की, उपाय करणं!’ असं गिलने या संदेशात म्हटलं आहे. आणि व्हीडिओत गिल ड्राईव्ह, स्विप या फटक्यांचा सराव करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियात गब्बावर ९१ धावा करून शुभमन गिल प्रकाशझोतात आला होता. आणि अल्पावधीतच उगवता खेळाडू म्हणून त्याने स्थान मिळवलं. पण, अलीकडे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी चांगली नव्हती. तर टी-२० विश्वचषकातही त्याला राखीव खेळाडूंमध्ये बसावं लागलं.

(हेही वाचा – Konkan Railway: खोळंबलेल्या एसटीमुळे कोकण रेल्वेचा चाकरमान्यांना मदतीचा हात; आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

(हेही वाचा – World Test Championship : कसोटी अजिंक्यपद शर्यतीतून पाकिस्तान बाद, तर बांगलादेश पहिल्या चारांत)

दुसरीकडे, दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन करणारा रिषभ पंतही (Rishabh Pant) दुलिप करंडकाच्या (Duleep Trophy) आणि पाच दिवसांच्या क्रिकेटच्या आव्हानासाठी तयार होत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या कार अपघातातून सावरून रिषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नुकती सुरुवात केली आहे. अशावेळी पूर्ण पाच दिवस मैदानात राहणं आणि यष्टीरक्षण करणं हे त्याच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. आणि दृष्टीने तंदुरुस्तीची परीक्षा म्हणूनही तो दुलिप कंरडकाकडे (Duleep Trophy) पाहत आहे.

काही महिन्यांपूर्वी आयपीएलमधून रिषभने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून तो आयपीएल खेळला. आणि त्यानंतर टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही तो सदस्य होता. आता कसोटी क्रिकेटसाठी तो सज्ज होत आहे. दुलिप करंडकात (Duleep Trophy) तो भारत ब संघातून खेळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.