Emerging Asia Cup : अफगाणिस्तानकडून भारताचा धक्कादायक पराभव; अफगाणिस्तान उपांत्य फेरीत 

Emerging Asia Cup : पंचांचा भारताविरुद्ध गेलेला निर्णय वादग्रस्त ठरला 

73
Emerging Asia Cup : अफगाणिस्तानकडून भारताचा धक्कादायक पराभव; अफगाणिस्तान उपांत्य फेरीत 
Emerging Asia Cup : अफगाणिस्तानकडून भारताचा धक्कादायक पराभव; अफगाणिस्तान उपांत्य फेरीत 
  • ऋजुता लुकतुके 

इमर्जिंग एशिया चषक स्पर्धेत भारतीय अ संघाला अफगाणिस्तानकडून पराभवाचा जोरदार धक्का बसला. उपांत्य फेरीतच स्पर्धेतून बाद होण्याची वेळही ओढवली. अफगाणिस्तानने भारताचा २० धावांनी पराभव केला. पहिली फलंदाजी करत अफगाणिस्तानने ४ बाद २०६ अशी धावसंख्या उभारली तेव्हा सामन्यात रंगत निर्माण झाली होती. याला उत्तर देताना भारताची आघाडीची फळी गडबडली आणि अफगाण विजय साध्य झाला. अल एमिरात मैदानावर अफगाणिस्तानचे सलामीवीर झुबैद अबकारी (६४) आणि सादिकुल्लाह अटल (८३) यांनीच संघाला मजबूत पायाभरणी करून दे सामना संघाच्या बाजूने झुकवला. १४ षटकांत १३७ धावा त्यांनी सलामीलाच जोडल्या. त्यानंतर करिम जन्नतनेही ४१ धावा केल्या. अफगाणिस्तानने ४ बाद २०६ अशी मजबूत धावसंख्या उभारली. भारताकडून रसिक सलाहने २५ धावांत ३ बळी घेतले. बाकीच्या गोलंदाजांनी फक्त धावा लुटल्या. (Emerging Asia Cup)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेतही ‘या’ ५ ठिकाणी काँग्रेस सांगली पॅटर्न राबवणार; मैत्रीपूर्ण लढत होणार?)

या धावसंख्येला उत्तर देताना भारताचीही सुरुवात चांगली होणं आवश्यक होतं. पण, अभिषेक शर्मा ७ धावा करूनच बाद झाला. थोड्या वेळाने प्रभसिमरनसिंगही १९ धावांवर परतला. डावात एकमेव अर्धशतक केलं ते रमणदीप सिंगने सहाव्या क्रमांकावरून. त्याने ३४ चेंडूंत ६४ धावा करत भारतीय संघाला निदान विजयाच्या जवळ आणलं. पण, तो बाद झाल्यावर भारताचं आव्हानही संपलं, आणि निर्धारित २० षटकांत भारतीय संघ ७ बाद १८६ धावा करू शकला. या पराभवासह भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अफगाणिस्तानकडून पराभवाची नामुष्की भारतीय संघावर ओढवली आहे. (Emerging Asia Cup)

दुसऱ्या उपांत्य लढतीत श्रीलंका ए संघाने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलंका ए विरुद्ध अफगाणिस्तान अ असा रंगणार आहे. भारताबरोबरच पाकिस्तानचं आव्हानही संपलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात पंचांचा एक निर्णय मात्र वादग्रस्त ठरला. अफगाणिस्तानच्या पहिल्या जोडीने १३७ धावा केलेल्या असताना तो क्षण आला. सलामीवीर झुबेद अकबरीने अकिब खानचा एक चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण, तो लेगसाईडला होता. आणि तिथे यष्टीरक्षक प्रभसिमरन सिंगने तो झेललाही. त्याने झेलासाठी अपील केलं. (Emerging Asia Cup)

(हेही वाचा- Aadhar Card ला ‘जन्म तारखेचा’ पुरावा मानण्यास Supreme Court चा नकार; ‘हा’ वैध दस्तऐवज मानला जाणार)

आधी मैदानावरचे पंचांनी तो झेल नसल्याचा कौल दिला. तिसऱ्या पंचांच्या बाबतीत अल्ट्राएज किंवा इतर तंत्राची सोय या स्पर्धेत नव्हती. त्यामुळे दाद मागण्याचा प्रश्नच नव्हता. पण, अचानक पंचांना आपला निर्णय पडताळून पाहावा असं वाटलं. त्यांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. फक्त टीव्ही रिप्ले पुन्हा पुन्हा पाहत त्यांनी अखेर अकबरी बाद असल्याचा निर्वाळा दिली. (Emerging Asia Cup)

आधी नाबाद दिलेला अकबरी अचानक बाद दिल्यामुळे भडकला. मैदानावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. भारतीय खेळाडूही चर्चा करत होते. इतक्यात अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकांनी अकबरीला मैदान सोडू नकोस असं सांगितलं. त्यामुळे परिस्थिती आणखी भडकली. तिसऱ्या पंचांसाठी अल्ट्राएज किंवा निकोमीटरची सोय नसताना त्यांचा असा सल्ला योग्य होता का हा वादाचा मुद्दा होता. त्यावर चर्चा होत राहिली. पण, अखेर सामना अफगाणिस्तानने जिंकल्यामुळे हा वाद रात्री शांत झाला (Emerging Asia Cup)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.