-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने १३ वर्षांनंतर पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रुम भारावलेल्या अवस्थेत होती. पाहूया तिथे उपांत्य फेरीतील विजय कसा साजरा झाला. (India in Final)
२०११ मध्ये यापूर्वी भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. तेव्हाच्या संघात आताचे विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन हे दोनच खेळाडू होते. बाकीच्या सगळ्यांसाठी खेळातील सर्वोच्च स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा हा प्रसंग काही औरच आहे. त्यामुळे या स्पर्धेतील आतापर्यंतचा अपराजित भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धचा उपांत्य फेरीतील विजय मिळवल्यानंतर अगदी भारावलेल्या अवस्थेत होता. (India in Final)
या विजयानंतरचे ड्रेसिंग रुममधील काही क्षण बीसीसीआयने संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत आणि त्यात भारतीय खेळाडूंच्या या संमिश्र भावना दिसतात. विजयाचा आनंद तर आहेच. पण, कामगिरी अजून फत्ते झालेली नाही ही जाणीवही आहे. एकूणच भारतीय खेळाडूंचे एकमेकांशी असलेले खेळीमेळीचे संबंध आणि विजयानंतरची संयत प्रतिक्रिया या व्हीडिओतून जाणवते. (India in Final)
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड प्रत्येक खेळाडूला मिठी मारून त्यांचं ड्रेसिंग रुममध्ये स्वागत करतात इथपासून हा व्हीडिओ सुरू होतो. कुलदीप यादव आणि शुभमन गिल यांना ते मिठी मारताना काही कानमंत्रही देतात. तर फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड विक्रमवारी फलंदाज विराट कोहलीला घट्ट मिठी मारतात असा हा व्हीडिओ आहे. (India in Final)
View this post on Instagram
आपल्या गोलंदाजीने दुसरा डाव गाजवणाऱ्या महम्मद शामीभोवती सगळे खेळाडू जमले आहेत. अश्विनला स्वत: या सामन्यात संधी मिळाली नाही. पण, शामी मैदानातून परतल्यावर अश्विन पुढे होऊन त्याचा हात हातात घेतो आणि त्याचं चुंबन घेतो, असं दृश्यही हेलावून टाकणारं आहे. (India in Final)
(हेही वाचा – Smriti Irani : दिवाळी भेट बनली वादाचा मुद्दा)
तर गोलदंजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रेही पटकन शामीकडे वळतात आणि ते काही बोलण्याच्या आत शमी म्हणतो, ‘जवाब देके आया हू,’ असाही क्षण कॅमेरात टिपलाय. सध्या भारतीय संघात नसलेला पण, आयपीएल गाजवलेला यजुवेंद्र चहल सामना बघण्यासाठी आला होता. त्यानेही सामन्यानंतर ड्रेसिंग रुमला भेट दिली आणि खेळाडूंचं अभिनंदन केलं. तर दुखापतीमुळे सध्या स्पर्धेतून बाहेर झालेला हार्दिक पांड्याही जातीने हा सामना पाहण्यासाठी आला होता. (India in Final)
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने विक्रमवीर विराट कोहलीचं अभिनंदन तर केलंच. शिवाय त्याच्याबरोबर स्टँडमध्ये बसलेल्या विराटची पत्नी अनुष्काचंही त्याने पुढे होऊन अभिनंदन केलं. असे सगळे क्षण बीसीसीआयच्या या व्हीडिओत दिसत आहेत. (India in Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community