-
ऋजुता लुकतुके
मुलतान कसोटीत पहिल्या डावांत पाचशेच्या वर धावा करूनही पाकिस्तानचा १ डाव आणि ४७ धावांनी पराभव झाला. इंग्लंडने पहिल्या डावांत विक्रमी ८२३ धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानचा दुसरा डाव झटपट गुंडाळला. इंग्लंडसाठी हा विजय महत्त्वाचा आहेच. पण, त्याचवेळी पाकिस्तानने लाजिरवाण्या पराभवामुळे कामगिरीचा तळ गाठला आहे. या पराभवानंतर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पाक संघ तळाला पोहोचला आहे. (Eng VS Pak, Multan Test)
(हेही वाचा- Terrorism: सीमेवर १५० दहशतवादी घुसखोरीच्या प्रतीक्षेत; बीएसएफची माहिती)
विशेष म्हणजे पहिल्या डावात ५५६ धावा करूनही पाक संघाच्या पदरी हा पराभव पडला. त्यानंतर इंग्लंडने ७ बाद ८२३ धावा केल्या. पहिल्या डावात इतक्या धावा झाल्यानंतर ही कसोटी अनिर्णित राहील अशीच अपेक्षा केली जात होती. पण, पाकिस्तानचा दुसरा डाव २२० धावांतच संपुष्टात आला. संघाचा पाचव्या दिवशी पराभव झाला. (Eng VS Pak, Multan Test)
या पराभवानंतर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पाकिस्तानचा संघ तळाला पोहोचला आहे. ८ कसोटींत ६ पराभव आणि २ विजयांसह त्यांची यशाची टक्केवारी फक्त १६ टक्के इतकी आहे. शिवाय शान मसूदच्या कप्तानी खाली संघाचा हा सलग सहावा पराभव झाला आहे. पाकिस्तानचा संघ आता पहिल्या डावात ५०० च्या वर धावा करूनही पराभव झालेला एकमेव संघ आहे. दुसरीकडे, इंग्लंडने कसोटी क्रमवारीतील आपलं चौथं स्थान भक्कम केलं आहे. (Eng VS Pak, Multan Test)
(हेही वाचा- क्षेपणास्त्र कम दारुगोळा बार्ज LSAM 12 नौदलाकडे सुपूर्द)
भारतीय संघ ७४ टक्के यशासह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर श्रीलंकन संघ आहे. भारतीय संघाने आगामी न्यूझीलंड विरुद्धची मालिका जिंकली तर त्यांचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीतील प्रवेश नक्की होईल. ही मालिका भारतातच असल्यामुळे भारताला चांगली संधी आहे. दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलियाची आतापर्यंतची कामगिरी भक्कम असली तरी इंग्लंड आणि श्रीलंकेचा प्रयत्न असेल तो त्यांना मागे टाकण्याचा.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community