- ऋजुता लुकतुके
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट (Joe Root) सचिन तेंडुलकरच्या प्रत्येक फलंदाजीच्या विक्रमाच्या मागावर आहे आणि त्यातील काही तो सरही करताना दिसत आहे. इंग्लंडने अलीकडेच न्यूझीलंडला पहिल्या ख्राईस्टचर्च कसोटीत हरवलं. जो रुटने दुसऱ्या डावात नाबाद २३ धावा केल्या आणि त्याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकरचा एक महत्त्वाचा कसोटी विक्रमही मोडला. चौथ्या डावांत खेळताना जो रुटने आता १,६३० धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर होत्या १,६२५ धावा. कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळपट्टी खराब झालेली असताना खेळणं हे सगळ्यात आव्हानात्मक मानलं जातं. त्यामुळे हा विक्रमही महत्त्वाचा आहे.
इंग्लंडचा ॲलिस्टर कूक, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ आणि वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल या इतर तीन फलंदाजांनी चौथ्या डावांत १,६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. शिवाय रुटने (Joe Root) ४९ चौथ्या डावामध्येच हा टप्पा गाठला आहे. तर सचिनने याच विक्रमासाठी ६० डाव घेतले होते. विशेष म्हणजे जो रुटची ही १५० वी कसोटी होती आणि कसोटीत त्याने एकूण १२,७७७ धावा केल्या आहेत. सर्वाधिक कसोटी धावांच्या क्रमवारीत तो सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.
(हेही वाचा – Rohit Sharma : रोहितच्या नवीन बाळाचं नाव आलं समोर, रितिकाने केली इन्स्टाग्राम पोस्ट)
चौथ्या डावांत सर्वाधिक कसोटी धावा :
१,६३० – जो रुट (इंग्लंड)
१,६२५ – सचिन तेंडुलकर (भारत)
१,६११ – ॲलिस्टर कूक (इंग्लंड)
१,६११ – ग्रॅमी स्मिथ (द आफ्रिका)
१,५८० – शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज)
तर सर्वाधिक कसोटी धावांचा महत्त्वाचा विक्रमही जो रुटच्या (Joe Root) आवाक्यातील आहे. तो इथं सचिन तेंडुलकर (१५,९२१) पेक्षा जेमतेम ३,००० धावांनी मागे आहे आणि रुट आणखी ४ वर्षं तरी खेळू शकतो. या यादीत रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड जो रुटच्या पुढे आहेत. तिघांनीही १३,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community