Female Cricket Umpire : इंग्लंडच्या स्यू रेडफर्न प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पहिल्या महिला पंच

पुरुषांच्या सामन्यात पंचगिरी करण्याचं स्वप्न रेडफर्न यांनी बाळगलं होतं

152
Female Cricket Umpire : इंग्लंडच्या स्यू रेडफर्न प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पहिल्या महिला पंच
Female Cricket Umpire : इंग्लंडच्या स्यू रेडफर्न प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पहिल्या महिला पंच
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंडमध्ये एका काऊंटी सामन्या दरम्यान स्यू रेडफर्न या माजी इंग्लिश महिला क्रिकेटपटूने पंचांची भूमिका बजावली. (Female Cricket Umpire) प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्या पहिला इंग्लिश महिला पंच ठरल्या आहेत.

इंग्लिश महिला क्रिकेटपटू स्यू रेडफर्न पुढील आठवड्यात एका काऊंटी विजेतेपद स्पर्धेत पंचगिरी करतील. त्यावेळी त्यांच्या नावावर एक विक्रम जमा होईल. पुरुषांच्या प्रथमश्रेणी सामन्यात पंचगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला पंच असतील.

ग्लॅमॉर्गन विरुद्ध डर्बीशायर या काऊंटी सामन्यात ते पंचाची भूमिका बजावणार आहेत. स्यू स्वत; आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्या आहेत. १९५५ ते १९९९ या काळात इंग्लिश महिला संघाकडून त्या २१ सामने खेळल्या आहेत. मंगळवारी होणारा हा सामना सोफिया मैदानावर आहे. इथंच दोन वर्षांपूर्वी स्यू रेडफर्न यांनी टी-२० सामन्यात पंचगिरी केली होती. हा आंतरराष्ट्रीय सामना होता.

त्यामुळे पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी करणाऱ्या या पहिल्या महिला पंच ठरल्या होत्या. आता प्रथमश्रेणी का असेना, कसोटी सामन्यांत पंचगिरीची संधी त्यांना मिळणार आहे. रेडफर्न ४५ वर्षांच्या आहेत.‘मी या संधीसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. आणि आता मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचाच माझा प्रयत्न असेल,’ असं रेडफर्न यांनी म्हटलं आहे.

पुरुषांच्या सामन्यात पंचगिरी करण्याचं स्वप्न रेडफर्न यांनी बाळगलं होतं. आणि आता हळूहळू त्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यापूर्वी महिलांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये यापूर्वीच रेडफर्न यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. दोन महिला विश्वचषक, ३ टी-२० विश्वचषक तसंच राष्ट्रकूल स्पर्धेतही त्यांनी पंचांची भूमिका निभावली आहे.

(हेही वाचा – MLAs Disqualification : आमदार अपात्रतेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे येणार आमने-सामने ? )

‘पंच म्हणून आतापर्यंत केलेलं काम ही माझ्या कारकीर्दीतील मला समाधान देणारी आणि माझी कारकीर्द फलश्रुत करणारी गोष्ट आहे. मला आता जास्तीत जास्त बिनचूक काम करायचं आहे. आणि पंच म्हणून नवनवीन पायंडे पार पाडायचे आहेत,’ असं रेडफर्न पुढे म्हणतात.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपल्यानंतर त्या पंचगिरीकडे वळल्या. आणि सुरुवातीला कोचिंग सारखी कामं सांभाळून त्या पंच म्हणूनही काम पाहत होत्या. पण, काही काळानंतर त्यांचा शांत स्वभाव, तिथल्या तिथे निर्णय देताना मनाचा समतोल या गोष्टींनी लोकांचं लक्ष वेधलं. आणि त्यांना पंच म्हणून अधिकाधिक संधी मिळत गेली. तिथून त्यांनी पंच होण्याचा व्यवसाय गार्भीर्याने घ्यायला सुरुवात केली. आता महिला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्या नावाजलेल्या पंच आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.